कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या अस्थी नातेवाइकांनी नेल्याच नाहीत

सकाळ वृत्तसेवा
Friday, 27 November 2020

मयताचे नाव...वय...पत्ता...नातेवाइकाचे नाव...संपर्क...सही...आणि शेवटी लिहिलेले असते, "अस्थी नेणार नाही', हे चित्र आहे, निगडीतील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झालेल्या मृतांची माहिती नोंदवहीतील. असे सुमारे अडीचशे जणांच्या अस्थी नातेवाइकांनी विसर्जनासाठी नेलेल्या नाहीत. मात्र, काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तेरा आणि अन्य अस्थींचे स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनी विधिवत विसर्जन केले आहे. सध्या 60 जणांच्या अस्थी विसर्जनाच्या प्रतीक्षेत आहेत.

पिंपरी - मयताचे नाव...वय...पत्ता...नातेवाइकाचे नाव...संपर्क...सही...आणि शेवटी लिहिलेले असते, "अस्थी नेणार नाही', हे चित्र आहे, निगडीतील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झालेल्या मृतांची माहिती नोंदवहीतील. असे सुमारे अडीचशे जणांच्या अस्थी नातेवाइकांनी विसर्जनासाठी नेलेल्या नाहीत. मात्र, काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तेरा आणि अन्य अस्थींचे स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनी विधिवत विसर्जन केले आहे. सध्या 60 जणांच्या अस्थी विसर्जनाच्या प्रतीक्षेत आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जन्माला आलेला प्रत्येक जीव मरणार आहे, हे त्रिवार सत्य आहे. तरीही, प्रत्येक जण जीवनाची लढाई लढत आहे. आपल्या पश्‍चात आपल्या वारसांचे भले होईल, यासाठी झटत आहे. धन, दौलत, संपत्ती कमावत आहे. पण, ज्यांच्यासाठी हे सर्व केले, तेच कोरोनामुळे परके झाल्याचे दिसत आहे. गेल्या नऊ महिन्यात शहरातील सोळाशेपेक्षा अधिक व्यक्तींचा बळी कोरोनामुळे गेला आहे. त्यातील साडेआठशे मृतदेहांचे दहन महापालिकेच्या निगडी स्मशानभूमीतील विद्युत दाहिनीत केले आहे. त्यातील सुमारे अडीचशे जणांच्या अस्थी घेण्यासाठी नातेवाईक आलेले नाहीत. गेल्या महिन्यात रुपीनगरमधील सामाजिक कार्यकर्त्यांनी तेरा जणांच्या अस्थींचे विधिवत विसर्जन केले आहे.

पिंपरी - शेतकरी व कामगार कायद्यातील बदलाविरोधात आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

चार ठिकाणी विद्युत दाहिनी 
निगडी स्मशानभूमीतील काम ठेकेदारामार्फत सुरू आहे. सध्या तिथे बाळासाहेब भोर, अरविंद भोसले, अनिल सोनकांबळे, भाऊराव उज्जैनकर, मनोज गडकरी, राजू कुमार, बाळू भंडारी काम करीत आहेत. या ठिकाणी पारंपरिक आणि विद्युत दाहिनीसुद्धा आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे दहन विद्युत दाहिनीतच केले जात आहे. महापालिकेने निगडीप्रमाणेच लिंकरोड पिंपरी, भोसरी आणि सांगवी येथेही विद्युत दाहिनीची व्यवस्था केली आहे. कोरोनामुळे शहरातील पहिला बळी 18 एप्रिल रोजी गेला होता. तेव्हापासून आजपर्यंत बळींची संख्या वाढतच आहे. 

कोरोनामुळे मृत्यू व अस्थी 

  • एकूण मृत्यू - 1618 
  • निगडी स्मशानभूमीत दहन - 850 
  • नातेवाइकांनी नाकारलेल्या अस्थी - 275 
  • विसर्जनाच्या प्रतीक्षेत अस्थी - 60 

'आजपर्यंत कोविडचे साडेआठशे मृतदेह दहन केलेले आहेत. चोवीस तास विद्युत दाहिनीचे काम सुरू होते. आजपर्यंत अडीचशे जणांच्या अस्थी नेलेल्या नाहीत. कारण, कोविडची धास्ती नातेवाइकांमध्ये होती. आता भीती हळूहळू कमी होऊ लागली आहे. कारण, अनेक जण येतात आणि अस्थी घेऊन जाऊ लागले आहेत. मात्र, अस्थी नेलेल्या नाहीत त्या नातेवाइकांची सही आम्ही घेत आहोत. त्यांचे लेखी घेत आहोत. आजपर्यंत काही अस्थी आम्ही विधिवत विसर्जित केल्या आहेत.'' 
- बाळासाहेब भोर, कर्मचारी, निगडी स्मशानभूमी

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bones of those death corona were not carried by relatives

Tags
टॉपिकस
Topic Tags: