ब्राम्हणोली गावाजवळ पवना धरणात एक तरूण बुडाला

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 1 November 2020


सौरभ मलिक (वय ३३ सध्या रहाणार- लोणावळा, मुळ रा. स्विन ब्लॉक,जलव्हायु विहार,गौतम बुध्द नगर उत्तर प्रदेश ) बुडलेल्या तरूणाचे नाव आहे. सौरभ हा लोणावळा येथील कैवलधाम येथे योगाचे शिक्षण घेत आहेत.

पवनानगर(पिंपरी) : ब्राम्हणोली गावाजवळ पवना धरणात एक तरुण बुडाल्याची घटना घडली आहे. ही घटना आज (रविवारी) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ब्राम्हणोली येथे घडली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सौरभ मलिक (वय ३३ सध्या रहाणार- लोणावळा, मुळ रा. स्विन ब्लॉक, जलव्हायु विहार, गौतम बुध्द नगर उत्तर प्रदेश ) बुडलेल्या तरूणाचे नाव आहे. सौरभ हा लोणावळा येथील कैवलधाम येथे योगाचे शिक्षण घेत आहेत.

वेल्हे तालुक्यात थरार! दापोडे येथे भरदिवसा हॉटेलचालकावर गोळीबार

सौरभ व त्याचे तीन मित्र काल शनिवारी रात्री पवना धरण परिसरातील टेंट कॅम्पिंगवर फिरण्यासाठी आले होते. रात्री कॅम्पिंगवर मुक्काम केल्यावर सकाळी ब्राम्हणोली येथील पार्किंगवर गाड्या उभ्या करून पवना धरणाच्या पाण्याकडे गेले. त्यानंतर पवना धरणात पोहण्यासाठी उतरले. त्यामध्ये सौरभला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. बाकीचे तीन मित्र पोहून बाहेर आले. मित्रांनी  सौरभला वाचविण्यासाठी आरडाओरडा केल्यानंतर स्थानिकांनी त्याला पाण्याबाहेर काढला व नंतर पवनानगर येथील ग्रामिण रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलिस करत आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: boy drowned in Pavana dam near Brahmanoli village