esakal | Breaking : बंडातात्या कराडकर पोहोचले देहूच्या वेशीवर
sakal

बोलून बातमी शोधा

Breaking : बंडातात्या कराडकर पोहोचले देहूच्या वेशीवर

संत तुकाराम महाराज बीज सोहळा यंदा 50 जणांच्या उपस्थितीत साजरा करण्याचे आवाहन सरकारने केले आहे.

Breaking : बंडातात्या कराडकर पोहोचले देहूच्या वेशीवर

sakal_logo
By
मुकुंद परंडवाल

देहू : संत तुकाराम महाराज बीज सोहळा यंदा 50 जणांच्या उपस्थितीत साजरा करण्याचे आवाहन सरकारने केले आहे. त्या आवाहनाला संत तुकाराम महाराज संस्थानने सहमती दिलेली आहे. तसेच, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देहूत संचारबंदी आहे. सरकारने देहूत जमावबंदी आणि संचारबंदी लागू केली आहे. अशा परिस्थितीत वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर देहूच्या वेशीवर सोमवारी (ता. 29) दाखल झाले आहेत. विठ्ठलवाडी येथील एका शेतात त्यांच्याबरोबर वारकरी आहेत. बंडातात्या कराडकरांनी आपली भूमिका सायंकाळी चार वाजता जाहीर करणार असल्याचे सांगितले आहे. 

बीज सोहळ्याची तयारी पूर्ण; देहूला छावणीचे स्वरूप, दोन दिवस संचारबंदी!

खरे तर सध्या कोरोना संसर्ग झपाट्याने वाढतो आहे. मात्र, वारकरी संप्रदायातील सोहळे आणि उत्सवही साजरे करण्यास मर्यादा येऊ लागल्या आहेत. मात्र, बंडातात्या कराडकर देहूत बीजेसाठी आलेले आहेत. त्यांनी धार्मिक सोहळ्याला मर्यादा का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे बीज सोहळ्याच्या पूर्वसंधेला पोलिस प्रशासन काय भूमिका घेते याबाबत उत्सुकता आहे. 

loading image
go to top