
Pimpri Chinchwad
sakal
पिपंरी : शहरातील रस्त्यांची झालेली चाळण, अर्धवट राहिलेली कामे आणि जागोजागी टाकण्यात आलेले रम्बलर वाहतुकीस अडथळा ठरत आहेत. त्यातही बऱ्याच रस्त्यांवर प्लॅस्टिकचे रम्बलर बसविण्यात आले होते. आता, हे तुटून फक्त खिळे शिल्लक राहिले आहेत. हे खिळे धोकादायक ठरत असून, चाक पंक्चर होऊन वाहनांच्या अपघाताची शक्यता आहे.