

Private vehicles enter BRT lanes
sakal
पिंपरी : जलद, सुरक्षित आणि कोंडीमुक्त प्रवासाचा अनुभव मिळावा, यासाठी शहरात बस रॅपिड ट्रान्झिट (बीआरटी) सेवा सुरू करण्यात आली. पण, पीएमपीसाठी राखीव असलेल्या या मार्गांतून खासगी वाहनेही बिनधास्त नेली जात आहेत. या बेशिस्त चालकांकडे प्रशासन डोळेझाक करत असल्याने अनेक समस्या वर्षानुवर्षे कायम आहेत.