बुलडोझर खड्ड्यात पडून चालकाचा मृत्यू

बुलडोझर खड्ड्यात पडून चालकाचा मृत्यू

पिंपरी : बुलडोझर खड्ड्यात पडून चालकाचा मृत्यू झाल्याची घटना पिंपरीतील एका बांधकाम साइटवर घडली. शिवाजी राजेंद्र मुकटे (वय ३३, रा. नखाते चाळ, रहाटणी फाटा, काळेवाडी) असे या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. शिवाजी हे बुलडोझर चालवीत असताना खड्ड्यात पडल्याने गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. तसेच बुलडोझरचे नुकसान झाले.

मोटारीच्या धडकेत तरुण जखमी
वाकड : रस्त्यावर उभ्या असलेल्या तरुणाला भरधाव मोटारीने पाठीमागून जोरात धडक दिल्याने तरुण जखमी झाल्याची घटना वाकड येथे घडली. सचिन भगवान तांबारे (वय २२, रा. संगम चौक, शास्त्रीनगर, कोथरूड) असे या अपघातात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात मोटार चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे वाकड पुलाखाली उभे असताना ही घटना घडली.

पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर घरफोडी
निगडी : निगडी पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर घरफोडीची घटना घडली. यामध्ये चोरट्याने ५५ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल व टॅब चोरला. सौरभ श्रीनिवास जोशी (रा. निगडी पोलिस ठाण्यामागे, प्राधिकरण) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे बाथरूममध्ये असताना कपाट उघडल्याचा आवाज आल्याने फिर्यादी यांनी बाहेर येऊन पाहिले असता गॅलरीच्या ग्रीलचा लोखंडी दरवाजा उघडून हॉलमध्ये शिरलेल्या चोरट्याने ५५ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरल्याचे समोर आले.

ऑफरचे आमिष दाखवून फसवणूक
पिंपरी : ड्रायफ्रूट कमी दरात विक्रीच्या कॉम्बो ऑफरचे आमिष दाखवून एकाची पावणे दोन लाखांची फसवणूक केल्याची घटना म्हाळुंगे येथे घडली. याप्रकरणी चंद्रकांत उत्तम गुंड (रा. द्वारकासिटी, म्हाळुंगे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार समस्त टेक्नॉलॉजिस पीआर नावाचे खातेधारक यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी काजू, बदाम, पिस्ता, मनुके असे प्रत्येकी एक किलो ड्रायफ्रूट फक्त ३९९ रुपयात अशी कॉम्बो ऑफरचे आमिष दाखविणारे पेज फेसबुक ॲपवर टाकून त्याद्वारे फिर्यादीच्या क्रेडिट कार्डची माहिती ऑनलाइन घेतली. तसेच फिर्यादीच्या सीव्हीव्ही नंबरचा वापर करून एक लाख ७९ हजार ४०० रुपये घेऊन फसवणूक केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com