मावळात बैलगाड्यांच्या पहिल्या बारीची.... भिर्रर्र झाली

न्यायालयाने बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिल्यानंतर कोविड प्रतिबंधक निर्बंधामुळे पुढे ढकलण्यात बैलगाडा शर्यतीच्या पहिल्या बारीची भिर्रर्र शुक्रवारी (ता. ११)मावळात अनुभवायला मिळाली.
Bullockcart Competition
Bullockcart CompetitionSakal
Summary

न्यायालयाने बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिल्यानंतर कोविड प्रतिबंधक निर्बंधामुळे पुढे ढकलण्यात बैलगाडा शर्यतीच्या पहिल्या बारीची भिर्रर्र शुक्रवारी (ता. ११)मावळात अनुभवायला मिळाली.

तळेगाव स्टेशन - न्यायालयाने बैलगाडा शर्यतीला (Bullockcart) सशर्त परवानगी दिल्यानंतर कोविड प्रतिबंधक निर्बंधामुळे पुढे ढकलण्यात बैलगाडा शर्यतीच्या (Competition) पहिल्या बारीची भिर्रर्र शुक्रवारी (ता. ११) मावळात अनुभवायला मिळाली. शेकडो गाडामालकांनी भंडार उधळत पहिल्या बारीमध्ये उत्साही सहभाग नोंदविला.

गेल्या १ जानेवारीला ऐनवेळी स्थगित करण्यात आलेला बैलगाडा शर्यतीचा कार्यक्रम निर्बंध शिथिल झाल्यानंतर मावळ तालुका अखिल भारतीय बैलगाडा संघटना आणि मावळ तालुका शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने बैलगाडा शर्यतीच्या पाहिल्या दोन दिवशीय बैलगाडा शर्यतीच्या बारीचे नाणोली तर्फे चाकण येथील हिंदकेसरी घाटावर आयोजन करण्यात आले आहे. बारीच्या पहिल्या दिवशी गाडामालकांच्या हस्ते बारी लावण्यात आली. पाहिल्याच दिवशी जिल्हाभरातुन तब्बल दोनशे गाडामालकांनी आपला सहभाग नोंदविला. सकाळी साडेआठपासून सायंकाळी साडेसहा पर्यंत बारी चालू होती. यानिमित्ताने गर्दीचा उच्चांक पाहायला मिळाला.लाउड्स्पिकरमधून निघणारी निवेदकांची श्लेबेतील भिर्रर्रची कर्णकर्कश आरोळी आणि घाटावर मधोमध टांगलेल्या डिजिटल घड्याळावरील सेकंदाचे आकडे बैलगाडा मालकांसह शौकिनांची क्षणोक्षणी उत्कंठा वाढवत होते.

Bullockcart Competition
चिंचवड : तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

अवघा घाट आणि परिसर उधळलेल्या भंडाऱ्याने माखून निघाला आहे. शर्यतीचे मुख्य निमंत्रक आमदार सुनील शेळके यांच्यासमवेत वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे, पुणे जिल्हा परिषदेचे पशुसंधारण समिती सभापती बाबुराव वायकर आणि मान्यवरांनी घाटावर भेट दिली. आज शनिवारी (ता.१२) दिड वाजता राज्याचे पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांचे बैलगाडा शर्यतीच्या घाटावर आगमन होणार असून, त्यांच्या हस्ते अंतिम बक्षीस वितरण होईल. प्रथम येणाऱ्या बारीला प्रत्येकी एक अशा एकूण २० मोटारसायकल बक्षीस म्हणून वाटप करण्यात येणार असून सोन्याची अंगठी आणि इतर बक्षिसांची लयलूट या शर्यतीत आहे.तोंडावर येऊन ठेपलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभरातील पुढारी या शर्यतीस भेट देण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com