

पिंपरी - घरफोडीतील आरोपींना ताब्यात घेण्यासाठी त्यांचा पाठलाग करीत असताना आरोपींनी पोलिसांवर गोळीबार केला. ही घटना गुरूवारी (ता. २३)'सकाळी तळेगाव दाभाडे जवळील सोमाटणे फाटा येथे घडली. यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.