esakal | सौ रुपये नहीं मिलते, कैसे जियेंगे

बोलून बातमी शोधा

Camel
सौ रुपये नहीं मिलते, कैसे जियेंगे
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - ‘लॉकडाउन तो लग गया, मगर पेट नहीं ना लॉक कर सकते दीदी... उंट की सवारी से पेट चलता था. रोज का पाचसौ रुपये मिलता था, अब सौ रुपये भी मिलता नहीं. कैसे संभालेंगे परिवार’ अशी करुण कहाणी दोन वेळच्या पोटाची पंचाईत झालेले मुकेश आणि एकनाथ सांगत होते.

पिंपळे गुरव आठ नंबर गल्ली येथे राहणारे मुकेश शिंदे आणि एकनाथ मालवे हे गेल्या २५ वर्षांपासून उंट सवारीचा व्यवसाय करीत आहेत. २३ मार्चला रात्री आठ वाजता लॉकडाउन सुरू झाले. तेव्हापासून कुटुंबाची जगण्याची कसरत सुरू झाली आहे. शहरात संचारबंदी असल्याने सध्या या व्यावसायिकाप्रमाणेच किरकोळ व्यावसायिकांचे जगणे अवघड झाले आहे. सध्या रस्तोरस्ती हातावर पोट असणारा किरकोळ वर्ग नजरेस पडत आहे. विक्रीची आस लावून बसलेले चेहरे ठिकठिकाणी नजरेस पडत आहेत. पोलिसांच्या कारवाईची भीती देखील पोटापुढे त्यांना क्षम्य वाटत आहे. यामध्ये फुटपाथ विक्रेते मोठ्या प्रमाणावर आहेत. तळागळातील वर्गाचा जगण्याचा प्रश्न मोठा निर्माण झाला आहे. पोटाला चिमटा बसत असल्याने सर्वजण लॉकडाउन उघडण्याची वाट पाहत आहेत.

आमचा हा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. २० ते ३० रुपये मी एका सवारी मागे घेतो. सध्या रस्त्यावर कोणी फिरकतानाही दिसत नाही. लहान मुलांना सवारी करण्यासही सर्वजण घाबरत आहे. दररोजचा उंटाच्या कुट्टीचा खर्च दोनशे रुपये आहे. तो काढणेही अवघड झाले आहे. उंटांची पैदावार होते ते सांभाळणेही अवघड झाले आहे. हेच आमच्या व्यवसायाचे दिवस आहेत. ते निघून गेल्यास उपासमारीची वेळ येईल.

- मुकेश शिंदे, सवारी व्यावसायिक, पिंपळे गुरव