भाजपमधील नाराजांना राष्ट्रवादीकडून गळ

Candidacy Deputy Mayor BJP NCP in pimpri
Candidacy Deputy Mayor BJP NCP in pimpri

पिंपरी ः महापालिकेचे सभागृह 128 निर्वाचित सदस्यांचे आहे. मात्र, राष्ट्रवादीच्या तीन व भाजपच्या एका नगरसेवकाचे निधन झाल्याने केवळ 125 सदस्यसंख्या राहिली आहे. परिणामी सत्ताधारी भाजपकडे स्वतःचे 76 व चार अपक्षांचा पाठिंबा असे 180 आणि विरोधी पक्ष राष्ट्रवादीकडे केवळ 34 संख्याबळ आहे, असे असताना त्यांनी उपमहापौरपदासाठी उमेदवार दिला आहे. यातून भाजपमधील नाराजांची चाचपणी राष्ट्रवादी करीत असल्याचे दिसते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे
 ► क्लिक करा

सलग पंधरा वर्षे महापालिकेत सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादीला 2017 चा पराभव जिव्हारी लागला आहे. आजही सभागृहात बोलताना राष्ट्रवादीचे बहुतांश नगरसेवक "केवळ 35 लाखांच्या मूर्ती खरेदी गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे आम्हाला सत्ता गमवावी लागली', अशी खंत व्यक्त करतात. त्यामुळे आगामी 2022 ची निवडणूक कोणत्याही परिस्थितीत जिंकायची, असे त्यांचे मनसुबे दिसतात. यासाठी पक्षाच्या निर्णयाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या भाजपच्या नगरसेवकांच्या सुरात सुर मिसळला जातो. अशा भाजपमधील नाराज नगरसेवकांची आगामी निवडणुकीत "साथ' घेण्याची त्यांची तयारी दिसते आहे. त्याचीच चाचपणी शुक्रवारी (ता. 6) सकाळी अकरा वाजता होणाऱ्या उपमहापौर निवडणुकीदरम्यान करण्याची खेळी राष्ट्रवादीने आखली आहे. त्यामुळेच संख्याबळामुळे पराभव दिसत असतानाही त्यांनी उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवला आहे. 

यापूर्वी गेल्या महिनाभरात झालेल्या आठ प्रभाग समित्यांचे अध्यक्ष व पाच विषय समित्यांचे अध्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादीने उमेदवार दिला नव्हता. त्यामुळे सर्व समित्यांवर भाजपचेच अध्यक्ष निवडून आले. शिवाय, यापूर्वी ताथवडेतील दोन विषयांच्या मंजुरीवरून स्थायी समितीत झालेल्या मतदानात सत्ताधारी भाजपमध्ये फूट पडून कौल राष्ट्रवादीच्या बाजूने गेला होता. हा अनुभव आणि प्रभाग व विषय समित्यांवरील नियुक्तीवरून भाजपमधील नाराजांची वाढती संख्या पाहता राष्ट्रवादीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. नाराजांचा फायदा उपमहापौरपदाच्या निवडणुकीत होईल, अशी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची अपेक्षा आहे. याशिवाय, जोडीला शिवसेनेचे नऊ, मनसे व अपक्ष प्रत्येक एक, अशा 11 नगरसेवकांची साथ राष्ट्रवादीला मिळणार असल्याचे उघड आहे. 

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा फायदा 
कोरोना व लॉकडाउनमुळे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेसुद्धा नगरसेवकांना शुक्रवारच्या महापालिका सभेला उपस्थित राहता येणार आहे. यापूर्वीच्या सर्वसाधारण सभांनाही ही सुविधा होती. त्यामुळे प्रत्यक्ष सभागृहात सत्ताधाऱ्यांपेक्षा विरोधी नगरसेवकांची उपस्थिती अधिक राहिलेली आहे. आताही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचे कारण सांगून नाराज मंडळी दांडी मारू शकते, त्याचा फायदा प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेदरम्यान आपलाच होईल, अशी शक्‍यताही विरोधकांनी गृहीत धरली आहे. मात्र, गेल्या वर्षी झालेल्या उपमहापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराने ऐनवेळी माघार घेतल्याने भाजपचा उमेदवार बिनविरोध निवडून आला होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com