esakal | गुंड अप्पा लोंढे खून प्रकरणात संशयितांवर आरोप निश्‍चिती
sakal

बोलून बातमी शोधा

Court

पुणे जिल्हा न्यायालयात प्रलंबित असलेल्या तत्काळ व महत्त्वाच्या प्रकरणांच्या सुनावणीला आता काहीशी गती देण्यात आली आहे. कुख्यात गुंड अप्पा लोंढे याच्या खून प्रकरणातील संशयितांवर मंगळवारी आरोपी निश्‍चिती (चार्ज फ्रेम) करण्यात आली. अनलॉकनंतर आरोपी निश्‍चिती करण्यात आलेले हे पहिलेच प्रकरण आहे.

गुंड अप्पा लोंढे खून प्रकरणात संशयितांवर आरोप निश्‍चिती

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - जिल्हा न्यायालयात प्रलंबित असलेल्या तत्काळ व महत्त्वाच्या प्रकरणांच्या सुनावणीला आता काहीशी गती देण्यात आली आहे. कुख्यात गुंड अप्पा लोंढे याच्या खून प्रकरणातील संशयितांवर मंगळवारी आरोपी निश्‍चिती (चार्ज फ्रेम) करण्यात आली. अनलॉकनंतर आरोपी निश्‍चिती करण्यात आलेले हे पहिलेच प्रकरण आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या प्रकरणात मोक्कानुसार संतोष भीमराव शिंदे, नीलेश खंडू सोलनकर, राजेंद्र विजय गायकवाड, आकाश सुनील महाडीक, नितीन महादेव मोगल, विष्णू यशवंत जाधव, नागेश लक्ष्मण झाडकर, मनी कुमार चंद्रा ऊर्फ अण्णा, विकास प्रभाकर यादव, गोरख बबन कानकाटे, अण्णा ऊर्फ बबड्या किसन गवारी, प्रमोद ऊर्फ बापू काळुराम कांचन, सोमनाथ काळुराम कांचन, रवींद्र शंकर गायकवाड, प्रवीण मारुती कुंजीर यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. लोंढे याचा भविष्यात जामिनास, वाळूच्या व्यवहारात आणि इतर धंद्यांत अडसर होऊ नये म्हणून आरोपींनी त्याचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. विशेष मोक्का न्यायाधीश ए. एन. शिरसीकर यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे.

पुरंदरमधील प्रस्तावित विमानतळासाठीच्या पर्यायी जागांचे सर्व्हेक्षण अंतिम टप्प्यात 

भा. द. वि.कलम 302, 143,147,148, 149, 120, भारतीय हत्यार कायदा कलम 3,4 (25), (27), महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा कलम 3(1),(i),(ii), 3(4) आदी कलमांनुसार आरोप निश्‍चिती करण्यात आली आहेत. याबाबत वैभव प्रकाश ऊर्फ अप्पा लोंढे (वय 22, उरुळीकांचन, हवेली) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
28 मे 2015 रोजी सकाळी मॉर्निंग वॉकला जात असताना लोंढेचा खून करण्यात आला होता.

अकरावीच्या ऑनलाइन वर्गातून एचएसव्हीसी अभ्यासक्रमाला डावलले

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर न्यायालयात केवळ तत्काळ व महत्त्वाच्या प्रकरणांवर सुनावणी घेतली जात आहे. ऍनलॉकनंतर हे पहिलेच प्रकरणात आहे ज्यात न्यायाधीशांनी व्हीसीद्वारे आरोप निश्‍चिती केली, अशी माहिती विष्णू जाधव याचे वकील ऍड. विजयसिंह ठोंबरे यांनी दिली.

Edited By - Prashant Patil

loading image
go to top