पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर कारला अपघात; तिघे जण गंभीर तर...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जुलै 2020

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या भरधाव कारला भीषण अपघात झाला.

बेबडओहोळ (ता. मावळ) : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या भरधाव कारला भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील तिघे जण गंभीर, तर एक जण किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना सकाळी दहा वाजता गहुंजे हद्दीत घडली. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

या अपघातात सुदीप घोश, शुभम फुंडे, अनुराग मिश्रा हे तिघे गंभीर जखमी झाले असून, प्रसाद पाटील किरकोळ जखमी झाला आहे. हे सर्वजण उल्हासनगर मुंबई येथून मारुती सुझुकी सियाझ या कारने पुण्याकडे जात होते. एक्स्प्रेस वेवरील गहुंजे स्टेडियमजवळ हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता, की यात कारचा पार चुराडा झाला. भरधाव वेगात असताना अचानक कारवरील नियंत्रण सुटले आणि कार एक्स्प्रेस वेवर सुरक्षेकरिता लावण्यात आलेल्या लोखंडी रेलिंग तोडून उलटली. या कारच्या वेगामुळे महामार्गावर लावलेले रेलिंग अक्षरशः तोडून दूर फेकले गेले.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या अपघातातील जखमींना एक्स्प्रेस वेवरील ट्रामा सेंटर येथे हलविण्यात आले आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील भरधाव वाहनांवर महामार्ग पोलिसांकडून दरोज स्पीडगनच्या माध्यमातून कारवाई करण्यात येते. परंतु, तरीदेखील वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करत आहेत. काही चालक आपला जीव धोक्यात टाकून महामार्गावर अपघाताला कारणीभूत ठरत आहे. स्वतःचा तसेच, इतरांच्या जीव धोक्यात घालताना पाहायला मिळत आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Car accident on Pune-Mumbai expressway