काळेवाडीत पार्किंगच्या कारणावरून पेटवली कार

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 19 November 2020

  • घरासमोर उभी केलेली कार एकाने पेटवली

पिंपरी : 'तू या ठिकाणी गाडी पार्क का करतो? तुझ्या गाडीची वाटच लावतो', अशी धमकी देत घरासमोर उभी केलेली कार एकाने पेटवली. ही घटना काळेवाडीतील गंगा कॉलनी येथे घडली. 

रुग्णसंख्या कमी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांनी दिला तपासणीचा सल्ला

याप्रकरणी वसंत अप्पा भोसले (वय 58, रा. गंगा कॉलनी, काळेवाडी) यांनी याबाबत वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी ज्ञानेश्वर बबन नढे (वय अंदाजे 50, रा. काळेवाडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी ज्ञानेश्वर याने फिर्यादी यांना 'तू या ठिकाणी गाडी पार्क का करतो? तुझ्या गाडीची वाटच लावतो', असे म्हणून शिवीगाळ करीत धमकी दिली. त्यानंतर फिर्यादी यांची कार बुधवारी (ता. 18) पहाटे अडीचच्या सुमारास घरासमोर उभी असताना, आरोपीने कारच्या कव्हरला आग लागून नुकसान झाले. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: car caught fire due to parking in kalewadi