esakal | खोपोलीजवळ कारला अपघात; चालकाचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

खोपोलीजवळ कारला अपघात; चालकाचा मृत्यू
  • भरधाव वेगात जाणाऱ्या कारवरील नियंत्रण सुटलयाने कार उलटली.

खोपोलीजवळ कारला अपघात; चालकाचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कामशेत (ता. मावळ) : भरधाव वेगात जाणाऱ्या कारवरील नियंत्रण सुटलयाने कार उलटली. त्यात करंजगावच्या तरुणाचा खोपोलीजवळ मृत्यू झाला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तानाजी नामदेव साठे (वय 43, रा. कामशेत, मूळ- करंजगाव ता. मावळ) असे तरुणाचे नाव आहे. साठे बुधवारी (ता. 18) रात्री साडेआठच्या सुमारास  कामशेत येथून कर्जतला नातेवाइकांकडे निघाले होते. व्यवसायाने इलेक्ट्रिशियन असलेलेले साठे त्याच्या कारने (एमएच 12, बीडब्ल्यू 6969) एकटे चाललेले होते. झोराबियन कंपनीच्या जवळ त्याचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार उलटून झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे चार भाऊ, पत्नी, दोन मुले व एक मुलगी, असा परिवार आहे.