होम क्वारंटाईन आहात का?; तर मग 'या' गोष्टी आवर्जुन करा!

daund.jpg
daund.jpg
Updated on

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार कोविडची अत्यंत कमी व पूर्वलक्षणे आढळून आलेल्या रुग्णांना गृह विलगीकरणात (होम आयसोलेशन) ठेवले आहे. शहराच्या विविध भागात तब्बल 17 दिवस निगराणीखाली ठेवलेले 4090 रुग्ण आहेत. होम आयसोलेट रुग्णांचा गहाळपणा व दिलेली खोटी माहिती कुटुंबीयांच्या जिवावर बेतू शकते. त्यासाठी रुग्णांनी डॉक्‍टरांच्या संपर्कात राहून योग्य माहिती पुरविल्यास संसर्गाला आळा बसू शकतो, असे डॉक्‍टरांनी सांगितले आहे.

स्वास्थ्य कॉल सेंटरवरून दिवसांतून दोन वेळा रुग्णांना कॉल करून आरोग्याची विचारपूस केली जात आहे. नमुने घेतल्यापासून ते दहा दिवसांपर्यंत ऍक्‍टिव्ह रुग्णांची माहिती घेतली जात आहे. दहा दिवसांनंतर ताप आल्यास किंवा लक्षणांची तीव्रता पाहून 11 ते 17 दिवसांपर्यंत रुग्णाला पुन्हा निगराणीखाली ठेवले जात आहे. त्यानंतर रुग्णांची माहिती घेऊन पुढील उपचार करूनच विलगीकरण प्रकिया थांबवले जात आहे.
होम आयसोलेट रुग्णांना सर्दी, ताप, खोकला, श्‍वसनाला अडथळा जाणवल्यास माहिती नोंदवून घेतली जात आहे. अडचणी जाणवल्यास रुग्णांनी तत्काळ डॉक्‍टरांना संपर्क करणे गरजेचे आहे. त्यानंतर अत्यवस्थ जाणवल्यास त्वरित रुग्णवाहिका पाठवून पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करून घेतले जात आहे. त्यासाठी प्रत्येकाने सावधगिरी बाळगून आरोग्य विभागाला वेळोवेळी माहिती देणे गरजेचे आहे. यासाठी रुग्णांचे व नातेवाइकांचे सहकार्य अपेक्षित आहे.

दाटीवाटीच्या परिसरात होम आयसोलेशनला परवानगी नाही. सुसज्ज घर व घरातील कुटुंबीयांची संख्या लक्षात घेऊनच आयसोलेशनचा निर्णय घेतला जात आहे. सोसायटीतील रहिवाशांना काही त्रास आहे का, याची देखील माहिती घेतली जात आहे. अन्यथा, गहाळपणामुळे इतरांनाही त्याची लागण होऊ शकते. 

होम आयसोलेशनसाठी मार्गदर्शक सूचना
- स्वतंत्र शौचालय
- घरातील जेवणाची भांडी वेगळी
- दररोज वापरणारे कपडे गरम पाण्यात निर्जंतुकीकरण करणे
- काळजीवाहू व्यक्तीने ट्रिपल लेअर मास्क वापरणे
- सतत मास्क घालणे व आठ तासानंतर बदलणे
- ओला किंवा खराब मास्क वापरू नये
- मास्क निर्जंतुक करुन डिस्पोज करणे
- रक्तदाब, हद्‌यरोगग्रस्त ज्येष्ठांसोबत संपर्क होता कामा नये
- पुरेसा आराम व योग्य आहार गरजेचा
- ऑक्‍सिजन पातळी व शरीराचे तापमान दररोज मोजणे
- खोलीत इतरांना प्रवेश निषिद्ध
- केवळ मोबाईलवरच सर्वांशी संपर्क
- हात लावलेली प्रत्येक वस्तू हायपोक्‍लाराईट सोल्यूशनने स्वच्छ करणे
- वारंवार हात व शरीर गरम पाण्याने व साबणाने स्वच्छ धुणे
- गरम पाणीच गरजेचे
- दिलेली औषधे व डॉक्‍टरांचा सल्ला बंधनकारक
- काळजीवाहू व्यक्तीने हॅंडग्लोव्हज घालणे अत्यावश्‍यक
- धूम्रपान करू नये

पिंपरीत होम आयसोलेट रुग्णांची संख्या (1 ते 22 जुलै)
- लक्षणे आढळलेले ऍक्‍टिव्ह रुग्ण ः 1265
- लक्षणानंतर निगराणीखाली ठेवलेले रुग्ण ः 4090

हा आहे हेल्पलाइन क्रमांक
020-67331140, 67331143

होम आयसोलेट केलेल्या रुग्णांनी नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. अन्यथा त्यांना दवाखान्यात दाखल करावे लागेल. लक्षणे तीव्र असल्यास त्यांनी योग्य ती दक्षता घ्यावी. त्यांच्या निष्काळजीपणामुळे इतरांना संसर्ग होता कामा नये. बिनधास्तपणे बाहेर जाणे घातक आहे.
- राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, वायसीएम रुग्णालय, पिंपरी

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com