भाजप नगरसेविकेच्या पतीवर चोरी प्रकरणी गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 2 February 2021

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेविकेच्या भंगार व्यावसायिक पतीसह दोघांवर गुन्हा दाखल असून ते फरार आहेत. सावरदरी येथे एअरसील टेक्‍नॉलॉजी एलएलपी ही कंपनी आहे.

पिंपरी - एका कंपनीतील गिअर बॉक्‍सचे सहा बेरींग चोरून नेल्याप्रकरणी रखवालदारासह तिघांना म्हाळुंगे पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यात पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेविकेच्या भंगार व्यावसायिक पतीसह दोघांवर गुन्हा दाखल असून ते फरार आहेत. 

भरदिवसा पिस्तूलाच्या धाकाने सोने लुटण्याचा प्रयत्न; सायरन वाजताच चोरट्यांनी काढला पळ

याबाबत मिळालेली माहिती अशी की,  बापू उर्फ अनिल घोलप (राहाणार निगडी) असे गुन्हा दाखल झालेल्या भंगार व्यावसायिकाचे नाव आहे. घोलप हे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेविका कमल घोलप यांचे पती आहेत. घोलप यांच्यासह रशीद भंगारवाला (रा. चाकण) हा फरार आहे. याप्रकरणी इम्रान शौकतअली बागवान (वय 19), इम्रान मुस्तफा हुसेन (वय 20) आणि रणजित राजेंद्र चौहान (वय 23, तिघे रा. उत्तरप्रदेश) यांना अटक केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सावरदरी येथे एअरसील टेक्‍नॉलॉजी एलएलपी ही कंपनी आहे. रणजित चौहान हा कंपनीत रखवालदार म्हणून काम करतो. 20 डिसेंबर 2020 ते 29 जानेवारी 2021 या कालावधीत कंपनीत चोरी झाली. कंपनीत चंद्रपूर येथील औष्णिक विद्युत केंद्रातून दुरूस्तीसाठी मशिनरी आली होती. त्यामधील गिअर बॉक्‍सच्या 12 बेरींगपैकी अडीच लाख रूपये किंमतीच्या सहा बेरींग चोरट्यांनी चोरल्या. याप्रकरणी म्हाळुंगे पोलिस चौकीत गुन्हा दाखल होता. पोलिसांनी कंपनीतील रखवालदार रणजित याची सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने या बेरींग बागवान व हुसेन यांना विकल्या. तर, त्यांनी भंगार व्यावसायिक बापू घोलप व रशीद यांना या बेरींग विकल्याचे समोर आले. आता म्हाळुंगे पोलिस अधिक तपास करत आहेत.

राडा... धुरळा! अखेर सहकारी संस्थांच्या निवडणुका जाहीर! ​


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: case file against bjp women corporators husband pimpari