esakal | राडा... धुरळा! अखेर सहकारी संस्थांच्या निवडणुका जाहीर!

बोलून बातमी शोधा

Election}

डिसेंबर २०२० अखेर निवडणुकीस पात्र असलेल्या ४४ हजार ६०० सहकारी संस्थांची निवडणूक पहिल्या टप्प्यात घेण्यात येतील.

pune
राडा... धुरळा! अखेर सहकारी संस्थांच्या निवडणुका जाहीर!
sakal_logo
By
अनिल सावळे

पुणे : कोरोनासह विविध कारणांमुळे लांबणीवर पडलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबत राज्य सरकारने मंगळवारी (ता. २) आदेश जारी केले. त्यामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार असून, ज्या टप्प्यांवर निवडणुका रखडलेल्या होत्या, त्यानुसार निवडणुका होणार आहेत. 

राज्य सरकारने पीक कर्जमाफीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी सहकारी सहकारी संस्थांच्या निवडणुका स्क्षगित केल्या होत्या. त्यानंतर कोरोनाच्या संसर्गामुळे निवडणुका ३१ डिसेंबर २०२० पर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. हा आदेश संपुष्टात आल्यानंतर राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय जाहीर केला. परंतु पुन्हा राज्य सरकारने गेल्या महिन्यात निवडणूक स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पुन्हा राज्य सरकारने मंगळवारी (ता. २) सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबत आदेश जारी केले आहेत. त्यामुळे आता प्राधिकरणाकडून निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे.

- महत्त्वाची बातमी : इन्स्टाग्रामची मैत्री पडली महागात, मित्रानेच केली मैत्रिणीच्या घरी चोरी

डिसेंबर २०२० अखेर निवडणुकीस पात्र असलेल्या ४४ हजार ६०० सहकारी संस्थांची निवडणूक पहिल्या टप्प्यात घेण्यात येतील. प्राधिकरणाने जिल्हा निवडणूक आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. निवडणुका प्रक्रिया पार पडताना सामाजिक अंतर आखण्यात यावे. मास्कचा वापर आणि थर्मल स्क्रीनिंग अशा उपाययोजनांचा अवलंब करावा, असे आदेशात नमूद केले आहे. 

वाहतूक शेतकऱ्यांनी नाही तर सरकारनेच बंद केलीय - राकेश टिकैत​

'गृहनिर्माण'च्या नियमावलीचा मुहूर्त कधी? 
राज्य सरकारने अडीचशेपेक्षा कमी सभासद असलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका कशा घ्याव्यात, याबाबत नियमावली जारी केलेली नाही. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी निवडणूक नियमावली दोन दिवसांत जाहीर करण्यात येईल, असे पुण्यात जाहीर केले होते. त्यानंतर पुन्हा आठ दिवसांत नियमावली जाहीर होईल, असे सांगितले. त्यालाही जवळपास एक महिना झाला. परंतु सरकारने अद्याप नियमावली जाहीर केलेली नाही. नियमावली आल्यानंतरच या गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका घेणे शक्य होणार आहे.

हवाई युद्धात भारताचं पारडं झालं भारी; जाणून घ्या Warrior Drone ची वैशिष्ट्ये​

पहिल्या टप्प्यात ३२१३ संस्थांच्या निवडणुका 
निवडणूक प्राधिकरणाकडून पहिल्या टप्प्यात तीन हजार २१३ सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये २० जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांसह साखर कारखाने, दूध संघ यासह इतर सहकारी संस्थांचा समावेश आहे. उर्वरित सहकारी संस्थांच्या निवडणुकांबाबत नियोजन करण्यात येईल, अशी माहिती निवडणूक प्राधिकरणाकडून देण्यात आली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)