esakal | ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्यावर गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

Case filed against eminent writer and Dyanpeeth award winner Bhalchandra Nemade

भोसरी पोलिस ठाण्यात भालचंद्र नेमाडे यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्यावर गुन्हा दाखल

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

पिंपरी : ज्येष्ठ  साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्याविरोधात भोसरी पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमाडे यांच्या 'हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ ' या पुस्तकात लमाण समाजातील स्त्रियांबद्दल दिलेली माहिती ही भावना दुखावणारी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी रमेश राठोड यांनी भोसरी पोलिस ठाण्यात नेमाडे यांच्या विरोधात तक्रार दिली आहे.

'हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ' या पुस्तकामध्ये लमाण समाजाबाबत केलेले विधान द्वेषाची भावना निर्माण करणारे आहे. असा आरोप नेमाडे यांच्यावर करण्यात आला आहे. राठोड यांच्या तक्रारीनंतर भोसरी पोलिस ठाण्यात भालचंद्र नेमाडे यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

loading image
go to top