
वडिलांचे महिलेसोबत असलेले प्रेमसंबंध मान्य नसल्याने मुलांनी वडिलांचा खून केला व मृतदेह भट्टीत जाळला.
Murder Case : वडिलांचा खून करून मुलांनीच मृतदेह जाळला भट्टीत; दोन जणांना अटक
चाकण - वडिलांचे महिलेसोबत असलेले प्रेमसंबंध मान्य नसल्याने मुलांनी वडिलांचा खून केला व मृतदेह भट्टीत जाळला. धनंजय नवनाथ बनसोडे (वय ४३), असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून, याप्रकरणी त्यांचे दोन मुलगे सुजित बनसोडे (वय २१) व अभिजित बनसोडे (वय १८) या दोघांना अटक केली आहे, अशी माहिती सहायक पोलिस उपायुक्त विवेक पाटील यांनी दिली.
धनंजय बनसोडे १५ डिसेंबर रोजी राहत्या घरातून कुठेतरी निघून गेल्याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यांचे नागपूर येथील एक महिलेसोबत प्रेमसंबंध होते. त्यांची तीन वर्षांपूर्वी सोशल मीडियाद्वारे ओळख झाली होती. याबाबतची माहिती समजल्यानंतर धनंजय यांचे घरात पत्नी व मुले सुजित, अभिजित यांच्याशी वारंवार वाद होत होते. दरम्यान, धनंजय हे बेपत्ता असल्याबाबत तपास करताना पोलिसांना त्यांच्या प्रेयसीबाबतची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तपास केला. त्यामुळे धनंजय यांच्या दोन मुलांनी १५ डिसेंबरच्या रात्री साडेबाराच्या दरम्यान त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉड टाकून त्यांचा खून केला. त्यानंतर त्यांचा मृतदेह कंपनीच्या भट्टीत टाकला व तो पूर्णपणे जाळला