
जुनी सांगवी : दिवंगत लोकनेते माजी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या जन्मदिनानिमित्त सांगवी येथे १५ फेब्रुवारीपर्यंत आयोजित दिवस-रात्र क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते शनिवारी (ता.८) झाले. यावेळी त्यांनी मैदानावर क्रिकेटचा आनंद घेत चौकार, षटकार खेचत आम्हाला ‘क्लीन बोल्ड’ करणे अशक्य, अशी मिश्कील टिप्पणी केली.