नोकरीसाठी कुणी पैसे मागत असेल, तर थांबा; तुमच्या सोबत हा प्रकार घडू शकतो

टीम ई सकाळ
शनिवार, 27 जून 2020

नोकरीच्या नियुक्तीचे खोटे पत्र देऊन तरुणाची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार नवी सांगवी येथे उघडकीस आला.

पिंपरी : नामांकित कंपनीत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका तरुणाला ऑनलाइन सव्वा सहा लाख रुपये बँकेत भरण्यास सांगितले. त्यानंतर नोकरीच्या नियुक्तीचे खोटे पत्र देऊन तरुणाची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार नवी सांगवी येथे उघडकीस आला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रविकुमार विरप्पा एन्नीकोपद (वय 29, रा. शितोळे मळा, गल्ली क्रमांक 4, नवी सांगवी) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी जॉब रिक्रुट्स नावाच्या कंपनीवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीला नोकरीसाठी जॉब रिक्रुट्स ऑनलाइन कंपनीच्या विविध मोबाईल क्रमांकावरून फोन आला. त्यावर आमच्या बेंगलोर येथील मर्सिडीज बेंझ या कंपनीत तुम्हाला नोकरी लावतो, असे फिर्यादीला सांगितले. 

हेही वाचा- Video : आता आंतरराष्ट्रीय दर्जाचं हे प्रदर्शन होणार मोशीत

त्यानंतर फिर्यादीच्या स्टेट बँक ऑफ इंडिया व स्टेट बँक या बँक खात्यातून आरोपींनी त्यांच्या सदाब आलम व ज्युली या दोन व्यक्तींच्या बँक खात्यावर सहा लाख 21 हजार 200 रुपये ऑनलाइन जमा करण्यास सांगितले. त्यानंतर फिर्यादीला नोकरीचे खोटे नियुक्तीपत्र दिले. यातून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने पोलिसांत धाव घेतली. सांगवी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा- Video : पिंपरी-चिंचवडकरांनो दातांच्या समस्यांसाठी दंतचिकित्सकांकडे जाणार असाल, तर ही बातमी वाचा​


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cheating for a job in new sangavi