

Traffic Chaos on Chikhali-Akurdi and Dehu-Alandi Roads
Sakal
चिखली : चिखली परिसराकडे जाणारा चिखली-आकुर्डी या मुख्य रस्त्याबरोबर देहू-आळंदी रस्त्यावर दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. मागील महिन्यात कृष्णानगर चौकाजवळ अपघातांत नागरिकांना प्राणाला मुकावे लागले. तरीही चालकांचा बेशिस्तपणा आणि वाहतूक पोलिसांकडून ठोस कारवाईचा अभाव कायम आहे.