
पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने मौजे चिखली व कुदळवाडी येथील प्रस्तावित टाऊन प्लॅनिंग (टीपी) स्कीम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत या निर्णयाला अधिकृत मंजुरी देण्यात आली असून, त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या निर्णयामागे स्थानिक भूमिपुत्रांची सातत्याने चाललेली लढाई, तसेच त्यांच्या बाजूने उभ्या राहिलेल्या लोकप्रतिनिधींचे पाठबळ यामुळेच यश मिळाले. काही दिवसांपूर्वीच प्रशासन आणि नागरिकांमध्ये झालेल्या चर्चेत या टीपी स्कीमबाबत तीव्र विरोध व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत ही योजना रद्द केली.