
सचिन उर्फ अंड्या लक्ष्मण चौधरी (वय 22, रा. परमवीर हौसिंग सोसायटी, रूपीनगर, तळवडे) असे अपहरण झालेल्या तरूणाचे नाव आहे.
पिंपरी : सराईत गुन्हेगार तरूणाचे अपहरण केल्याप्रकरणी चिखली पोलिसांनी गुन्हेगारी टोळीवर गुन्हा दाखल केला आहे.
सचिन उर्फ अंड्या लक्ष्मण चौधरी (वय 22, रा. परमवीर हौसिंग सोसायटी, रूपीनगर, तळवडे) असे अपहरण झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे वडील लक्ष्मण चौधरी यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
- मंचर नगरपंचायत तळ्यात-मळ्यात; इच्छुक उमेदवार व नागरिक संभ्रमात
त्यानुसार योगेश दिनेश सावंत (वय 22, रा. इंद्रायणी हौसिंग सोसायटी, रूपीनगर), आकाश उर्फ गुंड्या प्रकाश भालेराव (रा. संतकृपा हौसिंग सोसायटी, टॉवर लाईन रोड, तळवडे), रूपेश प्रकाश आखाडे (वय 23, रा. शिवरकर चौक, त्रिवेणीनगर, तळवडे) यासह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन चौधरी हा घरी झोपलेला असताना आरोपी शुक्रवारी (ता.11) पहाटे दोनच्या सुमारास त्याच्या घरी आले. जबरदस्तीने त्याला घरातून घेऊन गेले. मात्र, त्यानंतर सचिनचा कुठेही ठावठिकाणा लागलेला नाही. दरम्यान, सचिनचे वडील लक्ष्मण चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चिखली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
- भारतीयांना लसीबाबत मिळणार मोठा दिलासा! पुनावाला यांनी दिली महत्त्वाची माहिती
आरोपी योगेश सावंत याच्यावर निगडी ठाण्यात पाच गुन्हे, आकाश भालेराव याच्यावर तीन, रूपेश आखाडे याच्यावर चिखली ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. यासह अपहरण झालेला सचिन चौधरी याच्यावरही निगडी ठाण्यात चार आणि चिखली ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. चिखली पोलिस अधिक तपास करीत आहेत.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)