पिंपरी : मुंबई-पुणे महामार्गावरील चिंचवड स्थानक येथील महावीर चौक आणि चिंचवडगाव यांना जोडणाऱ्या लोहमार्गावरील जुना उड्डाणपूल पाडण्यात येणार आहे. त्याजागी नवा उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. या कामास मान्यता मिळाली आहे..महावीर चौकातून चिंचवडगावाकडे जाणारा डाव्या बाजूचा रेल्वे उड्डाणपूल १९७६ मध्ये बांधण्यात आला. त्याच्या उजव्या बाजूला समांतर उड्डाणपूल २००४ मध्ये बांधण्यात आला. जुना पूल स्ट्रक्चरल ऑडिटनुसार कमकुवत झाल्याचे आढळले. या अहवालानंतर महापालिकेने जुन्या पुलावरून हलकी वाहने आणि दुचाकी वगळता इतर वाहने नेण्यास प्रतिबंध केला आहे. .त्यामुळे येथून जाणारी जड वाहने आणि बस आकुर्डी खंडोबा माळ आणि पिंपरीतील इंदिरा गांधी उड्डाणपुलावरून वळविण्यात आली आहेत. तज्ज्ञांचा स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल आणि रेल्वे विभागाच्या मंजुरीनंतर जुना पूल पाडून नवा उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. नवीन पूल उभारल्यानंतर प्रवास अधिक सुलभ आणि सुरक्षित होणार आहे..दृष्टिक्षेपातचिंचवड स्थानक येथील लोहमार्गावरील जुना पूल पाडून त्याजागी नवीन पूल बांधण्याबाबत महापालिकेकडून विविध संस्थांच्या मदतीने तांत्रिक आढावा२०२१ मधील स्ट्रक्चरल ऑडिट आणि २०२२ मधील पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगने केलेले पुनरावलोकनानुसार जुना पूल पाडण्याची शिफारसरेल्वे विभागाने डिसेंबर २०२४ मध्ये जुना रेल्वे उड्डाणपूल पाडण्यासाठी आणि नवीन पुलाच्या आधुनिक पुनर्बांधणीसाठी संमती दिलीजुना पूल पाडून नवीन बांधण्यासंदर्भात प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराला चार मार्च २०२५ रोजी कार्यादेश दिला.चिंचवड स्थानकाजवळील जुन्या उड्डाणपुलाला जवळपास ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. तज्ज्ञांचा अहवाल तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी नवीन पूल उभारण्यात येणार आहे. रेल्वे विभागाची त्यास मंजुरी मिळाली असून नवीन पूल उभारण्यासाठी कार्यादेश देण्यात आला आहे.- शेखर सिंह, आयुक्त, महापालिका.नव्या पुलाचे फायदेदैनंदिन प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित होणारप्रवाशांच्या वेळेत बचत होणारवाहतूक कोंडीतून सुटकाहोण्याची अपेक्षा.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.