मौजमजेसाठी वाहन चोरणारे दोघे चिंचवड पोलिसांच्या ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
Monday, 7 December 2020

  • चोरी व मौजमजेसाठी वाहने चोरणाऱ्या चोरट्यांना चिंचवड पोलिसांनी अटक केली.

पिंपरी : चोरी व मौजमजेसाठी वाहने चोरणाऱ्या चोरट्यांना चिंचवड पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून एक रिक्षा, सात दुचाकींसह तांब्याची भांडी जप्त केली आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

इम्रान रहीम शेख (वय 19, रा. वेताळनगर झोपडपट्टी, चिंचवड), अमर सुनील वाघमारे (वय 19, रा. मोरया हाउसिंग सोसायटी, चिंचवड) अशी आरोपींची नावे आहेत. चिंचवड परिसरात गस्त घालताना एक ऑटो रिक्षा संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांना थांबण्यास सांगितले. मात्र, ते थांबले नाहीत. रिक्षाचा पाठलाग करून अडविल्यावर रिक्षामधून तीन मुले पळून जाऊ लागली. त्यातील दोघांना पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले. रिक्षाच्या कागदपत्रांबाबत विचारणा केल्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. सखोल चौकशी केली असता, रिक्षा चोरीची असल्याचे समोर आले. या गुन्ह्यात त्यांना अटक करून अधिक तपास केला, तर चोरी करण्यासाठी व मौजमजेसाठी चिखली, भोसरी, चिंचवड, वाल्हेकरवाडी भागातून दुचाकी चोरल्याचे त्यांनी कबूल केले. आरोपींकडून चोरीच्या सात दुचाकी जप्त केल्या. तसेच त्यांनी अल्पवयीन मुलाच्या मदतीने चोरीच्या रिक्षाचा वापर करून चिंचवडेनगर येथून एका टेम्पोतील तांबे व ऍल्युमिनिअमची भांडी चोरल्याचीही कबुली दिली. चिंचवड पोलिस अधिक तपास करीत आहेत. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तीन लाखांचा मुद्देमाल जप्त 

चोरलेल्या रिक्षा व दुचाकीबाबत चिंचवड पोलिस ठाण्यात सात, भोसरी व चिखली ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे. या आरोपींकडून एक ऑटो रिक्षा, सात दुचाकी व तांब्याची भांडी, असा एकूण तीन लाख 10 हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chinchwad police arrest two vehicle thief