Chinchwad By Election : राहुल कलाटे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल | chinchwad vidhan sabha by electionrahul Kalate independent application politics | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

chinchwad vidhan sabha by electionrahul Kalate independent application  politics

Chinchwad By Election : राहुल कलाटे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

पिंपरी : महाविकास आघाडीतून उमेदवारी डावलल्यानंतर शिवसेनेचे महापालिकेतील माजी गटनेते व माजी नगरसेवक राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज मंगळवारी (ता. ७) दाखल केला आहे. त्यामुळे या मतदारसंघात तिहेरी लढतीची शक्यता निर्माण झाली आहे.

वाकडचे ग्रामदैवत म्हातोबाचे दर्शन घेवून कलाटे यांच्या पदयात्रेला सुरुवात झाली. मोरया गोसावी महाराज यांचे दर्शन घेतले. पदयात्रेद्वारे शक्तिप्रदर्शन करत थेरगाव येथील “ग” क्षेत्रीय कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष नवनाथ जगताप, माजी नगरसेवक अमित गावडे, माजी नगरसेविका मीनल यादव, अश्विनी वाघमारे आदी यावेळी उपस्थित होते.

महाविकास आघाडीच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे आणि शिवसेनेचे राहुल कलाटे ही  दोन नाव सुरुवातीपासून चर्चेत होती. राहुल कलाटे यांचे नाव आघाडीवर होते. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे शिवसेनेचे राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. वाकड येथून मोठी पदयात्रा काढत कलाटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.