चिंचवड विधानसभा मतदार संघात मनसेचा भाजपला पाठिंबा - अनिल शिदोरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anil Shidore

चिंचवड मतदारसंघाच्या पोट निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने भारतीय जनता पक्षाला मनसे नेते अनिल शिदोरे व राजेंद्र उर्फ बाबू वागस्कर यांनी बुधवारी (ता. १५) पाठिंबा जाहीर केला.

Chinchwad Vidhansabha Byelection : चिंचवड विधानसभा मतदार संघात मनसेचा भाजपला पाठिंबा - अनिल शिदोरे

पिंपरी - चिंचवड मतदारसंघाच्या पोट निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने भारतीय जनता पक्षाला मनसे नेते अनिल शिदोरे व राजेंद्र उर्फ बाबू वागस्कर यांनी बुधवारी (ता. १५) पाठिंबा जाहीर केला.

पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने भाजपा शहराध्यक्ष, अमादार महेश लांडगे, प्रवक्ते एकनाथ पवार, अनुप मोरे, आरपीआयचे शहराध्यक्ष स्वप्निल कांबळे, मनसेचे नेते वागस्कर, शिदोरे, प्रभारी किशोर शिंदे, मनसे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सचिन चिखले पिंपरीतील मनसे कार्यालयात उपस्थित होते. यावेळी चर्चा करून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने चिचवड विधानसभेसाठी भाजपला पाठिंबा देण्यात आला.

या पोट निवडणुकीमध्ये सध्या तरी पक्षाचे कोणतेही कार्यकर्ते प्रचार सहभागी होणार नाहीत. पुढील नियोजन राज ठाकरे यांच्या आदेशाने केले जाईल.

- सचिन चिखले, शहराध्यक्ष, मनसे.