चिंचवडमधील भाजी मंडई सुरू होणार; पण, हे नियम पाळावे लागणार

सकाळ वृत्तेसवा
Monday, 1 June 2020

गेल्या दीड महिन्यांपासून अन्यत्र स्थलांतरित झालेल्या भाजी मंडईंनी अत्यावश्‍यक सेवेअंतर्गत पास देऊन पुन्हा मूळ जागी व्यवसाय सुरू करण्यास महापालिका प्रशासनाकडून परवानगी देण्यास सुरुवात झाली आहे.

पिंपरी : गेल्या दीड महिन्यांपासून अन्यत्र स्थलांतरित झालेल्या भाजी मंडईंनी अत्यावश्‍यक सेवेअंतर्गत पास देऊन पुन्हा मूळ जागी व्यवसाय सुरू करण्यास महापालिका प्रशासनाकडून परवानगी देण्यास सुरुवात झाली आहे. त्याअंतर्गत चिंचवड येथील भाजी मंडई बुधवारपासून (ता. 3) सुरू होणार असल्याने नागरिकांची मोठी सोय होणार आहे. यासंदर्भात महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी सोमवारी सायंकाळी आदेश काढला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चिंचवड येथील अखिल मंडई मित्र मंडळाचे अध्यक्ष अतुल पडवळ, उपाध्यक्ष सागर गरुड आदींनी महापालिका प्रशासनाकडे अत्यावश्‍यक सेवेअंतर्गत भाजीमंडई पुन्हा सुरू करण्यासाठी पासची मागणी करणारे पत्र दिले होते. त्यानुसार सर्व बाबींचा विचार करून प्रशासनाने त्यांना 30 जूनपर्यंत अटी, शर्तींवर भाजी मंडई सुरू करण्यास परवानगी दिली. पावसाला हळूहळू सुरुवात होऊ लागली आहे. स्थलांतरित झालेली मंडई चित्तराव गणपती मंदिराजवळील मोकळ्या जागेत सुरू होती. मात्र पावसामुळे गेले दोन दिवस ग्राहक फिरकत नव्हते. तसेच, तेथे कोणतीही पत्र्याची शेडची व्यवस्था नव्हती. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यासंदर्भात मंडळाचे उपाध्यक्ष सागर गरुड यांनी सांगितले, "मंडई अनेक दिवस बंद होती. त्यामुळे तेथे मंगळवारी (ता. 2) साफसफाई करून संपूर्ण मंडई सॅनिटाईज करण्यात येईल. त्यानंतर बुधवारपासून नियमितपणे व्यवसाय सुरू होईल.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

काय आहेत नियम 

  • मंडईत एकूण 48 गाळे आहेत. 
  • सम-विषम पद्धतीने गाळे सुरू राहतील. 
  • प्रवेशद्वारावर ग्राहकांना सॅनिटायझरचा वापर बंधनकारक 
  • ग्राहकांना सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर अत्यावश्‍यक 
  • शरीराचे तापमानाचे मोजमाप आवश्‍यक 
  • मंडईच्या एका बाजूने प्रवेश आणि दुसऱ्या बाजूने बाहेर जाता येईल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chinchwad's vegetable market will start from wednesday