नागरीकांची बातमीदारी

नागरीकांची बातमीदारी

खांबामुळे वाहतुकीस अडथळा
पुनावळे येथील हा खांब गेले चार महिन्यापासून काढलेला नाही. डीपीला वीज जोड नाही. खांबामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. सबधितांनी विभागाने त्वरित हा खांब येथून काढून टाकावा.
- कमलाकर कुलकर्णी, चिंचवड.

‘तो’ खड्डा त्वरित बुजविण्याची मागणी
दळवीनगर येथील समर्थ कॉलनी येथील कॉर्नर परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी खड्डा खोदून ठेवला आहे. त्यामुळे एखादा अपघात होण्याची शक्यता आहे. तरी प्रशासनाने याची दखल घेऊन लवकरात लवकर खड्डा बुजवावा.
- नरेश होसिंग, दळवीनगर, चिंचवड.

मिलिंदनगर परिसरातील चेंबरची दुरवस्था
पिंपरी डीलक्स चौक, मिलिंदनगर सी बिल्डिंगमधील चेंबर माती आणि गाळ यांनी भरलेले आहेत, महापालिका अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता अधिकाऱ्यांकडून उडवा-उडवीची उत्तरे मिळत आहेत, नागरिकांची तक्रारीची दखल घेतली जात नाही.
सुहास कुदळे, पिंपरीगाव

भटक्या कुत्र्यांचा उपद्रव
जुनी सांगवी परिसरामध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. रात्री येथून ये-जा करताना नागरिकांवर ही भटकी कुत्री भुंकत असतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. तरी पिंपरी- चिंचवड महापालिकेने येथील कुत्र्यांचा बंदोबस्त करावा.
- कमलेश गुप्ते, जुनी सांगवी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com