पिंपरी-चिंचवड : सरकारी कार्यालयांत नागरिकांचं बेजबाबदार वागणं ठरणार धोकादायक

आशा साळवी
Monday, 5 October 2020

  • ग्राहक, रेशन पुरवठादार आणि एजंटांची गर्दी 

पिंपरी : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, या उद्देशाने सरकारकडून सोशल डिस्टन्सिंगचे आवाहन केले जात आहे. मात्र, निगडीतील संत तुकाराम व्यापार संकुलातील अन्न धान्य परिमंडळ कार्यालयात नागरिक, रेशन पुरवठादार आणि एजंट यांची गर्दी पाहायला मिळते. परिणामी या सरकारी कार्यालयातच सामाजिक अंतर नियमाचे तीन-तेरा वाजल्याचे दिसत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

या परिमंडळ कार्यालय 'अ' विभाग (चिंचवड) अंतर्गत देहूरोड, निगडी, चिंचवड, सांगवी, पिंपळे गुरव, रहाटणी, काळेवाडी, थेरगाव आदी भाग येतो. तर 'ज' विभाग (पिंपरी) अंतर्गत पिंपरीगाव, पिंपरी कॅम्प, मोहननगर, खराळवाडी आदी परिसर येतो. या परिसरातील शिधापत्रिकेशी संबंधित कामकाज या कार्यालयात होते. सकाळी नऊपासून येथे नागरिकांची गर्दी असते. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुलासाठी अर्जासाठी शिधापत्रिका गरजेचे असल्याने गर्दीत भरच पडली आहे. जागा कमी असल्याने सर्वांना अगदी एकमेकांना चिटकून थांबावे लागते. येथे सामाजिक अंतर पाळण्याचे काही नियमावली लावलेली नाही की चौकोन आखलेले नाहीत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अधिकारी कोण, कर्मचारी कोण आणि एजंट कोण याबाबत माहिती नसल्याने एखाद्या कामासाठी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांचा गोंधळ उडत आहेत. शासकीय कार्यालयातच सामाजिक अंतर राखण्याच्या आदेशाला हरताळ फासला गेला आहे. याबाबत परिमंडळ अधिकारी दिनेश तावरे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizens ignore social distance in government offices at pimpri chinchwad