
पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हिंजवडी व माणमधील भूखंडांचा लिलाव करण्याऐवजी या जागांवर पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात, अशी मागणी माण-हिंजवडीतील नागरिक व आयटी कर्मचाऱ्यांनी केली आहे. भूखंडांचा लिलाव रद्द व्हावा, यासाठी हिंजवडी एम्प्लॉयी अॅण्ड रेसिडेंट ट्रस्ट अर्थात ‘हार्ट पुणे’ या संघटनेने ‘पीएमआरडीए’चे आयुक्त योगेश म्हसे यांना निवेदनही दिले.