
वेगवेगळ्या स्रोतांपासून डिसेंबरपर्यंत पुरेसे पाणी उपलब्ध करून शहरातील पाणीपुरवठा नियमित करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. त्यादृष्टीने कामे सुरू असून, दिवसाआड पाणीपुरवठ्यापासून नागरिकांची सुटका होऊन दररोज पाणी मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.
पिंपरी - वेगवेगळ्या स्रोतांपासून डिसेंबरपर्यंत पुरेसे पाणी उपलब्ध करून शहरातील पाणीपुरवठा नियमित करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. त्यादृष्टीने कामे सुरू असून, दिवसाआड पाणीपुरवठ्यापासून नागरिकांची सुटका होऊन दररोज पाणी मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
शहराचा सध्याचा विकास वेग व भविष्यातील लोकसंख्या विचारात घेऊल नवीन जलस्रोतांमधील पाणी आरक्षित करणे आवश्यक होते. त्यानुसार आंद्रा धरणातून १०० दशलक्ष आणि भामा-आसखेड धरणातूल १६७ दशलक्ष लिटर पाणी कोटा आरक्षित करण्यास जलसंपदा विभागाची मंजुरी मिळाली आहे, असे अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी सांगितले. या योजनेअंतर्गत आंद्रा व भामा-आसखेड धरणातून इंद्रायणी नदीवरील बंधाऱ्यापर्यंत पाणी आणणे, चिखली जलशुद्धीकरण केंद्र उभारणे, इंद्रायणी नदीवरील बंधाऱ्यापासून चिखली जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी आणणे, तेथून चिखली, चऱ्होली, वडमुखवाडी, दिघी, मोशी परिसरात पाणी वितरण योजना राबविण्याचे नियोजन आहे.
आकुर्डीत दोन टोळ्यांमध्ये राडा; परिसरात दहशतीचे वातावरण
वस्तुस्थिती...
चिखली जलशुद्धीकरण केंद्र बांधण्याचे काम सुरू आहे. त्याची मुदत २४ महिने आहे. या कामासाठी सुमारे ७९ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. इंद्रायणी नदीवरील तळवडे बंधाऱ्यापासून चिखली जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी सुमारे ४३ कोटी २७ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. भामा-आसखेड जॅकवेलपासून जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा आदेश दिला आहे. तळवडे बंधाऱ्यातून पाणी उचलण्यासाठी जॅकवेल व पंपिंग स्टेशन उभारणे, जागा ताब्यात घेणे, परवानग्या घेणे अशा कामांची कार्यवाही सुरू आहे. भामा-आसखेड येथे जॅकवेल व पंपिंग स्टेशन उभारणे, नवलाख उंबरे येथे बीपीटी उभारणे याकामाची निविदा प्रक्रिया प्रगतिपथावर असल्याचेही अतिरिक्त आयुक्त पवार यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘रावेत येथील जुन्या बंधाऱ्याच्या खालील बाजूस नवीन बंधारा बांधण्याचे नियोजन आहे. मात्र, त्याच्या प्रक्रियेसाठी वेळ लागत असल्याने जुन्या बंधाऱ्याची उंची वाढवून जादा पाणी घेण्याचे नियोजन आहे. यामुळे डिसेंबरपर्यंत पुरेसे पाणी उपलब्ध होऊन दररोज पाणीपुरवठा करणे शक्य होईल.’
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
दृष्टिक्षेपात आर्थिक तरतूद
पाण्याची सद्यःस्थिती
Edited By - Prashant Patil