द्रुतगती मार्गावर बोरघाटात कंटेनर उलटला अन्...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 2 September 2020

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बोरघाटात खोपोली हद्दीत भरधाव कंटेनर ब्रेक निकामी झाल्याने झालेल्या अपघातात क्लीनरचा जागीच मृत्यू झाला.

लोणावळा : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बोरघाटात खोपोली हद्दीत भरधाव कंटेनर ब्रेक निकामी झाल्याने झालेल्या अपघातात क्लीनरचा जागीच मृत्यू झाला. सुरज बघेल (वय-२७, रा.मदायन,ता.भेंड) असे मृताचे नाव आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या कंटेनरचे (एचआर  ४७ सी ३६३०) आज (बुधवार) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास बोरघाटात खोपोली हद्दीत अंडा पॉइंटजवळ तीव्र उतार व वळणावर ब्रेक्स निकामी झाले.

दरम्यान, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर महामार्गालगत उलटला. कंटेनरखाली दबल्याने सुरज बघेल याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच बोरघाट दस्तुरी महामार्ग पोलीस मदत केंद्र, आयआरबीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होत मदतकार्य सुरू केले.

हे वाचा - पुण्यात भाविकांची गर्दी टाळण्यासाठी पालिका, पोलिसांचा बंदोबस्त

पोलिसांनी अपघातास कारणीभूत ठरलेल्या कंटेनरचालक राजू भंवरसिंह बघेल (वय-३२, रा. रुबाली, ता. आरेल,  सुगावली रोड, जि.भेंड) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

(Edited by : Sagar Diliprao Shelar)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cleaner dies in Pune-Mumbai accident