वातावारणातील बदलामुळे रुग्ण संख्येत झाली दुपटीने वाढ

सर्दी, ताप, खोकला, डेंग्यू, कावीळ, अतिसार, न्यूमोनिया, अस्थमा, दम लागणे, दमा सदृष्य आजार, उलट्या, जुलाब, अंगदुखी इत्यादी आजारांचे प्रमाण वाढले आहे.
Sickness
Sicknesssakal
Summary

सर्दी, ताप, खोकला, डेंग्यू, कावीळ, अतिसार, न्यूमोनिया, अस्थमा, दम लागणे, दमा सदृष्य आजार, उलट्या, जुलाब, अंगदुखी इत्यादी आजारांचे प्रमाण वाढले आहे.

वाकड - जुलैमध्ये सलग १५ दिवस पावसाने लावलेली दमदार हजेरी, त्यांनंतर सलग १५ दिवस पडलेले कडक ऊन यामुळे वातावरणातील कमी झालेल्या आद्रतेमुळे लहान मुले व वयो वृद्धांना विषाणूजन्य व श्वसन सदृष्य आजारांचा त्रास होत आहे. परिणामी लहान मुले आजारी पडण्याचे प्रमाण वाढल्याने रुग्णालयांमधील दैनंदिन ओपीडीत दुपटीने वाढ झाली आहे.

सर्दी, ताप, खोकला, डेंग्यू, कावीळ, अतिसार, न्यूमोनिया, अस्थमा, दम लागणे, दमा सदृष्य आजार, उलट्या, जुलाब, अंगदुखी इत्यादी आजारांचे प्रमाण वाढले आहे. वातावरणातील आद्रता कमी होणे हे विषाणूंच्या वाढीस पोषक वातावरण असते त्यामुळे हँड फूट माऊथ डिसीज आजार आणि विषाणूजन्य आजार लहान मुलांमध्ये लवकर पसरतात फ्ल्यू-ईन्फ्लुएन्झा विषाणू सदृष्य आजारांचे प्रमाण मागील पंधरा दिवसांत प्रचंड वाढले आहे. हाता-पायांच्या कोपरावर, तळव्यांवर, गुडघे, जीभ, तोंडात आणि नितंब इत्यादी ठिकाणे कांजन्या सारखे लहान पुरळ येणे, त्यात पाणी भरणे प्रचंड ताप येणे, नाक गळणे हे या विषाणूजन्य आजारांचे लक्षणे आहेत.

त्यामुळे पालकांनी मुलांची काळजी घ्यावी, आजाराची तीव्रता कमी आहे तोवर डोकटरांना दाखवावे अन्यथा दुर्लक्ष केल्यास तीव्रता वाढते आणि मग डॉकटर देखील हतबल होतात. त्यामुळे मुलांचे पूर्ण शरीर झाकले जाईल, असे कपडे घालावे, घरी आल्यानंतर त्यांचे हात-पाय साबणाने स्वच्छ धुवावे, नियमित लसीकरण करावे. वातावरण बदल, हवेत असलेली आर्द्रता, रस्त्यांवरील खड्डे, त्यात पावसाचे पाणी साठून तयार झालेली डबकी या ठिकाणी डासांची उत्पत्ती होऊन मलेरिया, डेंग्यू, हिवताप यांसारखे आजार उद्भभवतात त्यामुळे मधुमेह, रक्तदाब, श्वसनाचे विकार असलेला जेष्ठांनी देखील इन्फ्लुएन्झाची लस घेणं आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले

प्रतिक्रिया -

वातावरणातील बदलामुळे लहान मुलांमध्ये सर्दी, ताप, खोकला अशा विविध विषाणूजन्य (फ्लू) आणि श्वसन विकारांचे प्रमाण वाढले आहे.त्यामुळे पालकांनी मुलांची काळजी घ्यावीच. याशिवाय मुलांना कोणत्याही आजारांची लक्षणे दिसल्यास घरगुती उपचार टाळावेत डॉकटरांच्या सल्ल्याने औषधे द्यावीत कोव्हिडं व फ्लूची लस द्यावी.

- डॉ. संदीप शिंदे, बालरोग तज्ञ, डायरेक्टर शिशु चिल्डरण क्लिनिक, सदस्य- कोव्हिडं टास्क फोर्स पिंपरी-चिंचवड

लहान मुलांमधे थंडी ताप, खोकला याचे प्रमाण वाढले आहे. त्यासाठी प्रामुख्याने मुलांची प्रतिकारशक्ती वाढविण्याकडे पालकांनी लक्ष द्यावे. बाहेरचे पदार्थ, फास्ट फूड खाणे टाळावे. तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. हळद, सुंठ टाकून दूध उकळून द्यावे. पाणी उकळून घ्यावे. आणि घाबरून न जाता डॉक्टरांना दाखवावे.

- डॉ. सारिका भोईर, अध्यक्ष फॅमिली फिजिशियन असोसिएशनच

पालकांनी काय खबरदारी घ्यावी -

  • पाण्याचे संतुलन ठेवावे, पाणी उकळून पिणे, ओव्हर काउंटर औषधें टाळावे, रस्त्यावरील पदार्थ खाणे टाळणे, पूर्ण कपडे घालणे, जेवणापूर्वी हात स्वच्छ धुणे, सकस आहार घेणे, डासांपासून बचाव करणे, १२ वर्षां खालील सर्व मुलांना इन्फ्लुएन्झाची लस द्यावी

  • १२ वर्षांच्या वरील मुलांना कोव्हिडं लस देने, आवश्यक, नियमित लसीकरण करवून घेणे

  • घरात स्वच्छता ठेवणे, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com