
शिल्पकलेचा काष्ठ हेही एक महत्त्वाचे माध्यम आहे. हस्तव्यवसाय व इतर उपयुक्त कला इत्यादींत जसा लाकूडकामाचा समावेश होतो, त्याचप्रमाणे उच्च प्रकारची शिल्पकला म्हणूनही काष्ठशिल्प गणली जाते.
मोशी : लाकडी सुंदर काष्ठशिल्पामध्ये मढवलेली अँटीक पिस सारखी दिसणारी भिंतीवरील घड्याळे सध्या मोशी-भोसरी दरम्यानच्या पुणे-नाशिक महामार्गालगत उत्तर प्रदेशच्या कलावंतांनी विक्रीसाठी ठेवली आहेत. कलेचे शौकीन असणारे नागरीक ही घड्याळे घेण्यासाठी आवर्जून थांबत आहेत.
शिल्पकलेचा काष्ठ हेही एक महत्त्वाचे माध्यम आहे. हस्तव्यवसाय व इतर उपयुक्त कला इत्यादींत जसा लाकूडकामाचा समावेश होतो, त्याचप्रमाणे उच्च प्रकारची शिल्पकला म्हणूनही काष्ठशिल्प गणली जाते.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
काष्ठशिल्पे अनेक जातींच्या लाकडांमध्ये करतात. काष्ठशिल्पांसाठी भारतात सागवान, शिसम, अक्रोड आदी जातींचे लाकूड वापरात आहे. सध्या ही घड्याळाची शिल्पे तयार करण्यासाठी आसाम राज्यातील आक्रोड या जातीच्या लाकडाचा वापर करत आहोत. पूर्वनियोजित कल्पनेनुसार लाकडाचे विविध भाग तयार करुन त्यामधून हरीण, गरुड, फुलांचे अलंकारिक आकार आदी आकार तयार करुन त्यात विविध कंपन्यांची घड्याळे बसविली जातात. त्यांत मूळ लाकडाच्या पाेताचाही विचार केला जातो.
ही घड्याळे एकाच प्रकारच्या लाकडाचे लहान मोठे आकार एकमेकांमध्ये गुंतवून केली जातात. यामध्ये सजावटीसाठी काचेचे रंगीत खडे, कवड्या, शिंपले आदी वस्तू लाकडामध्ये कोरून बसविण्यात येतात. या काष्ठशिल्पांचा पृष्ठभाग मेणाने गुळगुळीत करुन त्यावर चकाकीसाठी पॉलिशही केले जाते. काष्ठशिल्पांचा काही पृष्ठभाग गुळगुळीत, खडबडीत व कोरीवही ठेवला जात असल्याचे उत्तर प्रदेश सहानपूर येथून विक्रीसाठी आणलेल्या राजू व शहजाद या कलावंतांनी सांगितले.
- इंदापूरजवळ ट्रक-कारचा भीषण अपघात; पुण्यातील दांपत्याचा जागीच मृत्यू