esakal | आळंदी रस्त्यावरील कपड्याच्या दुकानाला आग
sakal

बोलून बातमी शोधा

Cloth Shop Fire

आळंदी रस्त्यावरील कपड्याच्या दुकानाला आग

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भोसरी - येथील आळंदी रस्त्यावरील आर. जे. फॅशन या कपड्याच्या दुकानाला मंगळवारी (ता. ५) रात्री सव्वा दहाच्या सुमारास आग लागून दुकानाच्या पोटमाळ्यावरील सर्व कपडे जळून खाक झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले. पाच अग्निशमन वाहनांद्वारे ही आग बुधवारी (ता. ६) पहाटे एक वाजता विजविण्यात आली. मात्र आगीच्या कारणाचा शोध घेत असल्याची माहिती अग्निशमन केंद्राद्वारे देण्यात आली.

मंगळावारी रात्री दुकान बंद केल्यावर दुकानाचे मालक घरी जात असताना दुकानाच्या नाम फलकामधून धूर येत असल्याची माहिती काही नागरिकांनी दिली. मात्र हा धूर पसरून चार दुकानाच्या नाम फलकांमधून बाहेर पडत असल्याने नेमकी आग कोठे लगली हे कळत नव्हते. तेव्हा दुकान मालकांनी दुकानाच्या नावाचे फलक फोडले तेव्हा ही आग आर. जे. फॅशन या दुकानाच्या नाम फलकांमधून येत असल्याचे कळले. त्या वेळी दुकानदारांनी खाली दुकानामध्ये असणारे कपडे तातडीने दुकानाच्या बाहेर काढली. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान टळले.

हेही वाचा: पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीनेच होणार

मात्र तोपर्यंत दुकानाच्या वरच्या पोट माळ्याने चांगल्या प्रकारे आग पकडली होती. ही आग विझविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य अग्निशमनद्वारे तीन, भोसरी अग्निशमन उपकेंद्र व चिखली अग्निशमन उपक्रंद्राद्वारे प्रत्येकी एक अग्निशमन वाहने पाठविण्यात आली. या अग्निशमन वाहनांद्वारे तब्बल तीन तसाच्या अथक प्रयत्नाने बुधवारी (ता. ६) पहाटे एक वाजता आग आटोक्यात आणण्यात आली. तोपर्यंत आर. जे. फॅशनच्या पोटमाळ्यात ठेवलेले सर्व कपडे जळून खाक झाले होते.

या विषयी दुकानाचे मालक जयराम येणारे म्हणाले, "नवरात्र उत्सव, दसरा आणि दिवाळी सणासाठी दुकानात कपड्यांचा स्टॅाक भरून ठेवला होता. मात्र लागलेल्या आगीमुळे पोट माळ्यावरील सर्वच कपडे जळून खाक झाल्याने आमचे सुमारे वीस ते पंचवीस लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.'

loading image
go to top