पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीनेच होणार

तीन सदस्य पद्धतीने पिंपरी चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक होणार असली तरी नगरसेवकांची संख्या आताच्या इतकीच म्हणजेच १२८ च राहणार आहे.
PCMC
PCMCSakal

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेची मुदत मार्च २०२२ मध्ये संपत आहे ‌ त्यापूर्वी फेब्रुवारीमध्ये निवडणूक होणे अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक घेण्याचे स्पष्ट केले आहे. त्या अधिनियमानुसार प्रारूप प्रभाग (वॉर्ड) रचना करण्याची सूचना राज्य निवडणूक आयोगाचे उपआयुक्त अविनाश सणस यांनी मंगळवारी काढली. त्यामुळे प्रशासन आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचनेची तयारी सुरू करणार आहे. त्यासाठी २०११ ची लोकसंख्या विचारात घेतली जाणार आहे.

तीन सदस्य पद्धतीने पिंपरी चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक होणार असली तरी नगरसेवकांची संख्या आताच्या इतकीच म्हणजेच १२८ च राहणार आहे. कारण, कोरोनामुळे २०२१ची जनगणना झालेली नाही. त्यामुळे २०११ ची लोकसंख्या विचारात घेऊन निवडणूक होणार आहे. मात्र, मतदार संख्या वाढलेली असल्याने त्यांच्यासाठी त्या त्या वाॅर्डातील मतदान केंद्रांची संख्या वाढणार आहे..

दरम्यान, महापालिकेत २००२ पासून २०१७ पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता होती. मात्र, २०१७ मध्ये भाजपने एकहाती सत्ता घेतली. तत्कालीन फडणवीस सरकारने चार सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार निवडणूक घेतल्याने भाजप विजयी झाल्याचा मतप्रवाह आजही आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसह अन्य पक्षांचाही चार सदस्यीय पद्धतीने आगामी निवडणूक घेण्यास विरोध होता.

PCMC
पिंपरीत कुत्र्यांमुळे अपघात; तरुणीचा मृत्यू

सध्याचे पक्षीय बलाबल

भारतीय जनता पक्ष : ७७

राष्ट्रवादी कॉंग्रेस : ३६

शिवसेना : ९

मनसे : १

अपक्ष : ५

एकूण : १२८

(गेल्या वर्षभरात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येकी दोन सदस्यांचे निधन झाले आहे)

चारवेळा एक सदस्य पद्धती

महापालिकेची स्थापना : १९८२

प्रशासक : १९८२ ते १९८६

पहिली निवडणूक : १९८६

एक सदस्य पद्धतीने निवडणूक : १९८६, १९९२, १९९७ व २००७

तीन सदस्यीय पद्धतीने निवडणूक : २००२

द्विसदस्यीय पद्धतीने निवडणूक : २०१२

चार सदस्यीय पद्धतीने निवडणूक : २०१७

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com