

State Govt Responds to Queries Over Coffin Purchase for Pune District Hospital
sakal
पिंपळे गुरव: सांगवी येथील जिल्हा रुग्णालयाच्या शवागारातील दोन जुन्या निरुपयोगी शवपेट्या काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ती पूर्ण झाल्यावर जिल्हा नियोजन समितीच्या अनुदानातून नवीन शवपेट्या खरेदी करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच अतिरिक्त दोन मृतदेह क्षमतेच्या शवपेट्या शवागारात बसविण्यासाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला कळविण्यात आले आहे.