esakal | ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत पिंपरी चिंचवड शहरात मंगळवारपासून महाविद्यालय सुरू | Pimpri
sakal

बोलून बातमी शोधा

pimpri

‘ब्रेक द चेन’ अंतर्गत पिंपरी चिंचवड शहरात मंगळवारपासून महाविद्यालय सुरू

sakal_logo
By
तेजस भागवत

पिंपरी : ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील सर्व माध्यामांच्या महाविद्यालयांचे नियमित वर्ग येत्या मंगळवार (ता.१२)पासून सुरू करण्याची परवानगी आयुक्त राजेश पाटील यांनी दिली आहे. मात्र कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयांत प्रवेश मिळणार आहे. याबाबत त्यांनी आज (ता.९)आदेश जारी केले आहेत.

पिंपरी-चिंचवडसह राज्यभरातील शाळा नुकत्याच (ता.४ ऑक्टोबर) सुरु झाल्या. त्यानंतर आता धार्मिक स्थळेही उद्यापासून (ता.७ ऑक्टोबर) उघडण्यात आली आहेत. कोरोनाची दुसरी लाट ओसरत चालली असली, तरी धोका कायम असल्याने महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी वर्ग यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दोन डोस अनिवार्य केले आहेत. महाविद्यालयात मास्कचा वापर, सामाजिक अंतर, सॅनिटायझेशन अशा कोरोना नियमांचे पालन बंधनकारक केले आहे. सर्व कोचिंग क्लासेस आणि प्रशिक्षण संस्थेच्या हॉलच्या आसनक्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. तेथील प्रशिक्षक व कर्मचाऱ्यांनाचेही दोन डोस पूर्ण करण्याचे सांगण्यात आले आहे.

शहरातील उपहारगृहे, रेस्टॉरंट, बार, फूडकोर्ट हे आठवड्यातील सर्व दिवस रात्री ११वाजेपर्यंत ५० टक्के आसन क्षमतेने सुरू राहणार असून पार्सल सेवा, घरपोच सेवा रात्री १२वाजेपर्यंत मिळणार आहे. तसेच शासकिय आणि खाजगी कार्यालयात १०० टक्के क्षमतेने उपस्थिती लागू केली आहे. मात्र त्यांनीदेखील कोविड लसीकरणाचे दोन डोस पूर्ण करणे आवश्‍यक असल्याचे आदेशात म्हटले आहे.

loading image
go to top