अवाजवी वीजबिलांबद्दल महावितरण म्हणतेय...

vij.jpg
vij.jpg

पिंपरी : शहरातील सुमारे अडीच हजार नागरिकांनी विद्युत महावितरण कंपनीकडून अवाजवी बिल आल्याच्या पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनकडे तक्रारी केल्या आहेत. 
पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांसमवेत महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची तीन-चार दिवसांपूर्वी ऑनलाईन वेबिनार झाला होता. यामध्ये फेडरेशनच्या वतीने अध्यक्षा तेजस्विनी ढोमसे, उपाध्यक्ष दत्तात्रेय देशमुख आदी सहभागी झाले होत.

तर महावितरण कंपनीच्या वतीने पिंपरी विभागाचे कार्यकारी अभियंता शिवाजी वायफळकर आणि अन्य अधिकारी सहभागी झाले होते. या वेबिनारमध्ये पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे अनेक सभासदांनी लॉकडाऊनच्या कालावधीत अवाजवी बिले आल्याच्या तक्रारी आल्याचे सांगितले. 

महावितरणची भूमिका 
महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आमची बहुतेक बिले योग्य आहेत. तरीही कोणाची तक्रार असल्यास त्याची दखल घेण्याचे आश्‍वासन वेबिनारमध्ये दिले. दुसरीकडे लॉकडाऊनच्या कालावधीत मनुष्यबळाची मोठी कमतरता असल्याचा मुद्दा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित केला. सध्या कर्मचारी कामावर रुजू होऊ लागले आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या तक्रारी सोडविण्यात येतील, असे आश्‍वासन कंपनीतर्फे देण्यात आले. 
फेडरेशनकडून लेखी तक्रारी या वेबिनारमध्ये ठरल्यानुसार फेडरेशनने त्यांच्या सभासदांकडून गुगल फॉर्मद्वारे सविस्तर स्वरुपात तक्रारी नोंदवून घेतल्या. त्यानुसार गेल्या तीन-चार दिवसात अडीच हजार जणांनी तक्रारी केल्या आहेत. 

यासंदर्भात फेडरेशनचे उपाध्यक्ष दत्तात्रेय देशमुख यांनी सांगितले, "आगामी एक-दोन दिवसात आणखी काही तक्रारी येणे अपेक्षित आहेत. त्यानंतर हा सर्व डेटा महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात येणार आहे. ग्राहकाचा मीटर क्रमांक, मोबाईल क्रमांक, आलेले बिल आदी मुद्दे त्या अर्जांमध्ये आहेत. महावितरण कंपनीकडे या तक्रारी सोपविल्यावर आठ ते दहा दिवसांत त्यांचे निवारण होणे अपेक्षित आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

अवाजवी बिले- एप्रिलपासून वीजदर वाढले. त्यामुळे त्याच महिन्यापासून कंपनीने वाढीव बिले देणे अपेक्षित होते. मात्र तसे न करता थेट जूनच्या बिलात हा सर्व फरक समाविष्ट करण्यात आला. तरीही अनेकांना बिले जास्त आली आहेत. लॉकडाऊनच्या कालावधीत जे नागरिक परगावी गेले होते. त्यांनाही पाच ते सहा रुपये बिले देण्यात आली आहेत. टू-बीएचके घर असलेल्या एका ग्राहकाला तब्बल 21 हजार रुपयांचे बिल देण्यात आले आहे. 

ग्राहकांच्या तक्रारी नोंदवून त्याची योग्य ती दखल घेऊन त्या सोडविणारी सक्षम यंत्रणा महावितरण कंपनीकडे नसल्याचे सकृतदर्शनी दिसते. कंपनीने जर एखादा फ्रि टोल क्रमांक यासाठी उपलब्ध करुन द्यावा. त्यामुळे ग्राहकांचा आणि महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्याही वेळेत बचत होईल. 
-अरुण देशमुख, प्रवक्ते-पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com