esakal | 'या' कार्यकर्त्याची श्रद्धा पाहून शरद पवारही झाले नि:शब्द!
sakal

बोलून बातमी शोधा

'या' कार्यकर्त्याची श्रद्धा पाहून शरद पवारही झाले नि:शब्द!
  • शरद पवारांची ती इच्छा अपूर्णच राहिली.

'या' कार्यकर्त्याची श्रद्धा पाहून शरद पवारही झाले नि:शब्द!

sakal_logo
By
सकाळ वृ्त्तसेवा

पिंपरी : महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांचे अढळ स्थान आहे. जनमानसांत त्यांच्या नेतृत्त्वाने वेगळं स्थान निर्माण केलंय. कार्यकर्त्यांच्या मनातला जाणणारा नेता अशी त्यांची ओळख आहे. तसेच, राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रातही ते कार्यकर्त्यांशी कौटुंबिक नाते जपतात. त्याच्या सुख-दु:खात वेळोवेळी सहभागी होतात. त्यामुळेच कार्यकर्ते त्यांना देवासमान व पितृतुल्य मानतात, याचा प्रत्यय आज भोसरी येथे आला. तो अनेकांनी पाहिला अन् पवारांसह अनेक जण निशब्द झाले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

हेही वाचा- Video : कोरोनाचा कहर तरी, शरद पवारांनी कार्यकर्त्याला श्रद्धांजली द्यायला गाठलं त्याचं घर, वाचा सविस्तर

भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांना नुकताच पितृशोक झाला. त्याआधी त्यांच्या मातोश्रींचे निधन झाले. त्यावेळी पवारांनी लांडे यांना मोबाईलवर साधून विचारपूस केली होती. तेव्हा बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढताना भोसरीत आल्यावर तुमचे वडील आणि सहकारी घराच्या ओट्यावर बसलेले असायचे. तुमच्या वडिलांचे वय काय, मला त्यांना एकदा भेटायचंय, असा संवाद सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावेळी लांडे म्हणाले, की माझ्या वडिलांचे वय १०२ वर्ष आहे. ते वारकरी आहेत. त्यांच्या देव्हाऱ्यात विठोबा जसा आहे, तसाच तुमचा फोटोही आहे, असे भावूक उद्गार लांडे यांनी त्यावेळी पवारांशी बोलताना काढले होते. या गोष्टीला एक महिनाही होत नाही, तोच लांडे कुटुंबीयांवर दुसरा आघात झाला. त्यांचे वडील विठोबा लांडे यांचे निधन झाले. मात्र, शरद पवारांची ती इच्छा अपूर्णच राहीली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

...अन् शरद पवार झाले भावूक

शरद पवारांनी विलास लांडे यांच्या घरी देव्हाऱ्याला भेट दिली. त्यावेळी पवार भावूक झाले. कारण देव्हाऱ्यात विठ्ठल-रुक्मिणीसह शरद पवार यांची प्रतिमा आहे. विठोबा लांडे हे दररोज देवांसह पवारांच्या प्रतिमेचे पूजन करायचे. अखेरपर्यंत त्यांनी पवार यांच्यावरील निष्ठा आणि श्रद्धा कायम ठेवली. एखाद्या वयोवृद्ध व्यक्तीने आपल्यावर अपार श्रद्धा ठेवली. त्यांना भेटण्याची इच्छा असूनही ती अपूर्ण राहिली, अशी खंत त्यांच्या मनाला लागली. त्यामुळे ते काहीवेळ नि:शब्द होते.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा