Pune Traffic
sakal
पिंपरी-चिंचवड
Pune Traffic: बांधकाम यंत्रांचा भररस्त्यात मुक्काम; बिजलीनगर ते वाल्हेकरवाडी रस्त्यावर बेशिस्तीत भर
Construction machines: चिंचवडमधील बिजलीनगर चौक ते वाल्हेकरवाडी मुख्य रस्त्यावर बांधकामाची यंत्रे व साहित्य रस्त्यात टाकल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे अपघाताचा धोका वाढून नागरिकांना कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.
पिंपरी : बांधकामासाठी वापरली जाणारी यंत्रे आणि अन्य साहित्य चक्क भररस्त्यात ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. रस्त्याची रुंदी कमी झाल्याने वाहनांची गर्दी वाढत असून, नागरिकांना कोंडीचा त्रास सहन करावा आहे.