
Hinjewadi Traffic
Sakal
हिंजवडी : बांधकाम प्रकल्पांवरील अवजड वाहनांच्या बेफाम वर्दळीमुळे नागरिकांच्या सुरक्षेसह रस्त्यांची स्वच्छता धोक्यात आली आहे. या विरोधात पोलिसांपाठोपाठ महापालिकेनेही कठोर पावले उचलली आहे. रस्ता घाण करून पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्य नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पुनावळे, ताथवडे परिसरातील बांधकाम व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.