तळेगाव स्टेशन - सोमवारपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही, तर पाणी टंचाईने त्रस्त झालेल्या नागरिकांना नगरपरिषद कार्यालयासमोर आणून बसवणार आहे. रस्त्यांची कामे वेळेवर पुर्ण होत नसतील तर कंत्राटदारांनी उपकार म्हणून कामे करु नयेत. असा सज्जड दम आमदार सुनील शेळके यांनी नगरपरिषदेचे अधिकारी आणि संबंधित विभागाच्या कंत्राटदारांना भरला.