

पिंपरी - खाद्यतेलाची भाववाढ आणि दुसऱ्या बाजूला त्याचे पॅकिंगही छोटे होत आहे. पूर्वी ९२० ग्रॅम (एक लिटर) तेलाची पिशवी आता ८०० ग्रॅमची झाली आहे. तर ४,६०० ग्रॅमचा (पाच लिटर) डबा आता ४,२०० ग्रॅमचा झाला आहे. हे पॅकिंग छोटे होत असल्यामुळे ग्राहकांना कमी मालासाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत.