Coronavirus : हिंजवडी, माणनंतर आता जांबेतही कोरोनाचा रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

हिंजवडी, माणनंतर आता जांबेतही कोरोनाचा रुग्ण सापडला आहे.

हिंजवडी : जांबे येथील एका मोठ्या टाऊनशिपमध्ये राहणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तिला कोरोनाची लागण झाल्याचे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी लकडे यांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जांबे येथील एका उच्चभ्रू सोसायटीत ही व्यक्ती राहत असून, पत्नीच्या उपचारासाठी ते काही दिवसांपूर्वी मुंबईला गेले होते. तेथे दोन दिवस मुक्काम केल्यानंतर ते पुन्हा मारुंजीला आले होते. 16 मे रोजी त्यांना लक्षणे आढळून आल्याने त्यांची कोरोना चाचणी केल्यावर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.  तसेच, त्यांच्या संपर्कातील सात जणांना क्वारंटाइन केले असून, त्यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे, मुबईहून येणाऱ्यांमुळे डोकेदुखी...
हिंजवडी, माणनंतर आता जांबेतही कोरोनाचा रुग्ण सापडला आहे. सुरुवातीला पुण्यातून आलेला ज्येष्ठ व्यक्ती हिंजवडीमध्ये राहिल्यानंतर कोरोनाबाधित असल्याची बातमी ताजी असताना माण येथील फेज-3 मध्ये मुंबईवरून आपल्या मुलीकडे आलेली एक महिला कोरोनाबाधित असल्याची बातमी दोन दिवसांपूर्वी आली होती. आज गुरुवारी (ता. 21) जांबे गावात सापडलेला कोरोनाबाधित मुंबईहून आला होता. त्यामुळे मुंबई-पुण्यावरून येणारे लोक कोरोनाला सोबत घेऊन येत आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona infected person found in Jambe