esakal | पिंपरी-चिंचवडमधील 'या' दाट लोकवस्तीत वाढतोय कोरोना!
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी-चिंचवडमधील 'या' दाट लोकवस्तीत वाढतोय कोरोना!

10 झोपडपट्ट्या, पाच चाळी आणि दाट लोकवस्तीच्या 12 ठिकाणी आढळलेत रुग्ण 

पिंपरी-चिंचवडमधील 'या' दाट लोकवस्तीत वाढतोय कोरोना!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : कोरोना शहरातील झोपडपट्टी, चाळी व दाट लोकवस्तीमध्ये शिरला आहे. दररोज सरासरी 35 ते 40 जणांना संसर्ग होत आहे. त्यामुळे शहरातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून, नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळणे व सार्वजनिक ठिकाणांसह घरातसुद्धा मास्क वापरणे आवश्‍यक आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप     

कोरोना संसर्गाचा पहिला रुग्ण 11 मार्च रोजी शहरात आढळला. त्यानंतरच्या आठ दिवसात पुणे-मुंबईपेक्षा अधिक रुग्ण आढळले. मात्र, महापालिकेने सरकारच्या आदेशानुसार कडक निर्बंध पाळत सुरुवातीला चांगले नियंत्रण मिळविले. मार्चच्या दुसऱ्या पंधरवड्यातील तब्बल दहा दिवस एकही रुग्ण आढळला नाही. मात्र, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून रुग्ण वाढीला सुरुवात झाली आणि गेल्या पंधरा दिवसांपासून त्यांची संख्या दिवसाला 30 पेक्षा अधिक झाली. रुग्ण आढळलेला भाग कंटेन्मेंट झोन जाहीर करून सील करण्यात आले. सुरुवातीला सोसायट्यांमध्ये आढळणारा कोरोना आता झोपडपट्ट्या, चाळी व दाट लोकवस्तीच्या भागातही शिरला आहे. शहरातील 71 पैकी 10 झोपडपट्ट्यांमध्ये रुग्ण आढळले आहेत. पाच चाळी व चाळीवजा घरे असलेले दाट लोकवस्तीचे 12 ठिकाणे किंवा गल्ल्या आहेत. कंटेन्मेंट झोन म्हणून ते जाहीर केले आहेत. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दाट लोकवस्तीचे भाग 

चिंचवड स्टेशन आनंदनगर, इंदिरानगर, रामनगर; पिंपरी भाटनगर, बौद्धनगर, आंबेडकरनगर, भीमनगर, नाणेकर चाळ; भोसरी चक्रपाणी वसाहत, धावडेवस्ती, फुलेनगर; दापोडी गुलाबनगर, बॉम्बे कॉलनी; किवळे एमबी कॅम्प; काळेवाडी गायकवाड चाळ; आकुर्डी दत्तनगर, शेट्टी चाळ; फुगेवाडी; निगडी साईनाथनगर; कासारवाडी केशवनगर; दिघी विजयनगर; रहाटणी शिवराजनगर, श्रीकृष्ण कॉलनी; चिखली शरदनगर; जुनी सांगवी ढोरेनगर, मधुबन, संगमनगर. 

अशी आहे वस्तुस्थिती 

- पुन्हा आढळले रुग्ण : दिघीतील विजयनगर, चिंचवड स्टेशनचे इंदिरानगर, रहाटणीतील छत्रपती चौक व भोसरीतील चक्रपाणी वसाहत 

- अडचणी : झोपडपट्टी, चाळी व दाट लोकवस्तीमध्ये घरांचा आकार लहान व एकमेकाला लागून असल्याने सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात अडचणी 

- उपाययोजना : झोपडपट्ट्यांमध्ये मास्क व साबन वाटप, फ्लू क्‍लिनिक व मोबाईल लॅबद्वारे तपासणी 

- कारवाई : सार्वजनिक ठिकाणी मास्क नसल्यास दोनशे व थुंकल्यास दीडशे रुपये दंडाची आकारणी. 

- आवाहन : पावसाळा असल्यामुळे घराबाहेर पडताना किमान दोन मास्क सोबत ठेवा. ओला मास्क वापरू नका. सार्वजनिक ठिकाणी व घरामध्येसुद्धा मास्क वापरा. 

शहरातील कंटेन्मेंट झोन 

पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांनी शहरात आतापर्यंत एकूण 132 कंटेन्मेंट झोन जाहीर केले आहेत. त्यापैकी 54 ठिकाणचे रुग्ण बरे झाल्याने ते कंटेन्मेट झोन रद्द केले आहेत. सध्या 78 झोन ऍक्‍टिव्ह आहेत. म्हणजे येथील रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. मात्र, दिघीतील विजयनगर, चिंचवड स्टेशन येथील इंदिरानगर, रहाटणीतील छत्रपती चौक व भोसरीतील चक्रपाणी वसाहत येथील रुग्ण बरे झाले होते. त्यामुळे हे चारही कंटेन्मेंट झोन रद्द केले होते. मात्र, आता पुन्हा रुग्ण आढळल्याने तिथे पुन्हा निर्बंध लागू केले आहेत.

loading image