चिंताजनक! मावळात कोरोनाबाधितांचा आकडा आज आणखी वाढला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 जुलै 2020

मावळ तालुक्याच्या शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.

वडगाव मावळ (पुणे) : मावळ तालुक्याच्या शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. शनिवारी दिवसभरात तळेगाव व सोमाटणे येथे प्रत्येकी दोन; तर लोणावळा, निगडे व गहूंजे येथे प्रत्येकी एक अशा एकूण सात जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या १२५ झाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

दरम्यान, तळेगाव येथील कोरोना बाधित ५० वर्षीय भाजीविक्रेत्या महिलेचा शनिवारी सकाळी मृत्यू झाला. २७ तारखेला तिचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तिच्यावर तळेगाव येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरु होते. तिच्या दोन्ही मुलांचे अहवाल यापूर्वीच पॉझिटिव्ह आले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तालुक्याच्या शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. शनिवारी दिवसभरात सात नवे रुग्ण आढळल्याने तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या सव्वाशे झाली आहे. त्यात शहरी भागातील ५२, तर ग्रामीण भागातील ७३ जणांचा समावेश आहे. तळेगाव येथे सर्वाधिक ४३, लोणावळा सात तर वडगाव येथे दोन अशी रुग्ण संख्या झाली आहे. आतापर्यंत मृतांची संख्या सहा झाली असून, ४७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या ७२ जणांवर विविध ठिकाणी उपचार सुरू असल्याची माहिती तालुका आरोग्यधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona infection to seven people in maval taluka