
'कोरोना काय असतो, त्याच्यामुळे काय त्रास होतो, हे ज्याला कोरोना होऊन गेलाय, त्याला विचारा. पाय दुखतात. अंग दुखते. वेदना होतात. श्वास घ्यायला त्रास होतो. अन्नाला चव लागत नाही. रुग्णालयाच्या त्या खोलीत आपण एकटेच. तो एकटेपणा खायला उठत होता. सात दिवस कसे काढले, आमचे आम्हाला माहिती. एक मात्र बरे होते, स्मार्टफोनमुळे व्हिडिओ कॉल करून घरच्यांचे चेहरे बघायला मिळत होते.
पिंपरी - 'कोरोना काय असतो, त्याच्यामुळे काय त्रास होतो, हे ज्याला कोरोना होऊन गेलाय, त्याला विचारा. पाय दुखतात. अंग दुखते. वेदना होतात. श्वास घ्यायला त्रास होतो. अन्नाला चव लागत नाही. रुग्णालयाच्या त्या खोलीत आपण एकटेच. तो एकटेपणा खायला उठत होता. सात दिवस कसे काढले, आमचे आम्हाला माहिती. एक मात्र बरे होते, स्मार्टफोनमुळे व्हिडिओ कॉल करून घरच्यांचे चेहरे बघायला मिळत होते. तेवढाच एक दिलासा. पण पुन्हा भेट होईल की, नाही या भीतीने झोपही लागत नव्हती. सर्व संपलेच, अशीच भावना होती,' हे शब्द आहेत कोरोनावर मात करून बरे झालेल्या रुग्णांचे. "नको रे बाबा असले वर्ष' अशीच त्यांची भावना होती.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
गेल्या नऊ-दहा महिन्यांपासून शहरातील, गावांतील प्रत्येक घरांत; गल्लीत, सोसायटीत; चारचौघात गप्पा मारताना एकच शब्द ऐकायला मिळतोय. तो म्हणजे कोरोना. कोणाला शिंक आली किंवा सर्दी झालेली असल्याचे जाणवले तरी मनात शंका यायची. भीती वाटायची. आता त्याच्या संसर्गाचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. त्यामुळे सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाली आहेत. नव्या वर्षात सोमवारपासून (ता. 4) काही प्रमाणात शाळा सुरू होत आहेत. सरत्या वर्षाला निरोप दिला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना होऊन गेलेल्या काही रुग्णांशी संवाद साधला.
आरोपी अमली पदार्थ जगतातील संघटित गुन्हेगारांना देतात आश्रय
भोसरीतील महिला म्हणाली, 'कोरोना काय असतो, ते मी अनुभवलंय. कोणा वैऱ्यालाही तो होऊ नये. पाय खूप दुखायचे. रडायला यायचं. कोणाचा फोन आला तरी नको रिसिव्ह करायला, असे वाटत होते.'' चऱ्होलीतील कामगार एकनाथ चव्हाण म्हणाले, 'सर्दी, खोकला अशी कोणतीही लक्षणे नव्हती. फक्त अंग दुखत होतं म्हणून डॉक्टरांनी टेस्ट करायला लावली आणि ती पॉझिटिव्ह आले. क्वारंटाइन सेंटरला आठ दिवस राहिलो. तिथे सर्व व्यवस्था होती. पण, कुटुंबापासून दूर राहावे लागले. नशीब माझ्यामुळे घरच्यांना झाला नाही.''
खासगी कंपनीत कामाला असलेला त्रिवेणीनगरमधील तरुण मनीष जाधव म्हणाला, 'कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यावर थोडे घाबरलो. पण, घरच्यांनी धीर दिला. अंग खूप दुखत होते. औषधे वेळेवर घेत गेलो. जेवणही चांगले मिळत होते. त्यामुळे बरा झालो. या घटनेला तीन महिने होताहेत. पुन्हा असला आजार होऊ, नये म्हणून अजूनही मास्क घालतो. सॅनिटायझरची बाटली सोबत असते. रिस्क नकोच.''
पुणे-अहमदनगर रस्ता वाहतुकीसाठी बंद; रस्त्यावर शुकशुकाट!
मोबाईलमुळे आधार वाटायचा
मला दोन मुले आहेत. एक मुलगा, एक मुलगी. पती शिक्षक. मीही शिक्षिका. सर्व काळजी घेऊनही कोरोना झाला. कसा झाला कळलंच नाही. पण, खूप घाबरले. सात दिवस रुग्णालयात होते. कुणालाही भेटू दिले जात नव्हते. फक्त मोबाईल फोन जवळ होता. त्यावर व्हिडिओ कॉल करून मुलांशी बोलायचे. त्यांना आधार द्यायचे. पण, माझी पती मला आधार द्यायचे. अन्य वेळी खूप रडायला यायचे. एकटीच रडत बसायचे. तो प्रसंग म्हणजे नरकयातना होत्या. अशा स्थितीत फक्त मोबाईल हाच आधार होता. मन रमवण्यासाठी त्याचा खूप उपयोग झाला, अशी भावना खासगी शाळेत शिक्षिकेने सांगितले.
Edited By - Prashant Patil